कोल्हापूरात गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

कोल्हापूर : शिल्पा माजगावकर

गणेशोत्सव कालावधीमध्ये मंडळांनी डॉल्बी सिस्टीम आणि ज्यादा आवाजाची साऊंड सिस्टिम लावू नये असा आवाहन पोलिसांनी केलं होतं. साऊंड सिस्टिम लावणार्‍यांवर कारवाई करण्याचे संकेतही पोलिसांनी दिले होते. असे असताना काही मंडळांनी साऊंड सिस्टिम लावल्यामुळे पोलिसांनी कोल्हापुरातील 15 मंडळातील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत . त्याचबरोबर साऊंड सिस्टिम , मिक्सर आणि चार चाकी वाहन असा सुमारे सात लाख रुपयांचा जप्त केला आहे.

गणेश उत्सव कालावधीमध्ये ध्वनिप्रदूषण होऊ नये, तसेच डीजे मुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मध्ये हाणामारीचे प्रसंग उद्भवू नये यासाठी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे गणेशोत्सव मंडळांना डॉल्बी आणि मोठ्या आवाजाची साऊंड सिस्टिम न लावण्याचे आदेश कोल्हापूर पोलिसांनी दिले होते. याला काही मंडळांनी चांगला प्रतिसाद दिला तर काही मंडळांनी हे आदेश धुडकावून देत मंडळ परिसरात तसेच गणेश मिरवणुकीत मोठ्या आवाजाची साऊंड सिस्टिम लावल्याने कोल्हापूर पोलिसांनी 15 मंडळांवर कारवाई केली आहे. यामध्ये कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याबरोबरच साऊंड सिस्टिम मिक्सर आणि वाहनही पोलिसांनी जप्त केली आहेत.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी

गणेशोत्सवातील पुढील काळात जर मंडळांनी साऊंड सिस्टिम अथवा डीजे लावण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे संकेत कोल्हापूर पोलिसांनी दिले आहेत.

[amazon_link asins=’B01FXJI1OY,B07CD2BN46′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’90b7a975-b82b-11e8-8f07-d51896c69476′]