ATM मधून ‘कॅश’ नाही निघाली अन् अकाऊंटमध्ये पैसे कापत झाल्यास भरा ‘हा’ फॉर्म, बँकेला द्यावे लागतील रोज 100 रुपये

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कधी कधी असं होतं की, ATM मधून कॅश निघाली नाही पण अकाउंट मधून पैसे मात्र कटतात. बँकेला संपर्क साधला असता बँक 24 तासाच्या आत पैसे खात्यात येतील असा भरोसा देते. पण अनेक वेळा पैसे परत येत नाहीत. पण घाबरू नका, तुम्ही तुमचे पैसे परत मिळवू शकता. आणि ते देखील व्याजासहित. कारण रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार तुम्ही बँकेतून पैसे काढले ते तुम्हाला मिळाले नाही आणि बँकेतून मात्र पैसे कटले तर ते देण्याचे काम बँकेचे आहे. रिझर्व्ह बँकेने अशा अनेक तक्रारीनंतर सप्टेंबर 2019 पासून असा नियम लागू केला आहे. ज्यातून खात्याच्या सुरक्षेची जबाबदारी बँकेला देण्यात आली होती.

या नियमांना समजून घ्या

– तुम्ही बँकेतून पैसे काढले ते तुम्हाला मिळाले नाही आणि बँकेतून मात्र पैसे कटले तर ते देण्याचे काम बँकेचे आहे.

– तक्रार दाखल केल्यानंतर 7 दिवसांच्या आत ग्राहकाला पैसे मिळाले पाहिजेत.

– सात दिवसानंतर पैसे नाही आले तर बँकेने त्या ग्राहकाला रोज 100 रुपये दिले पाहिजे.

– सात दिवसात पैसे नाही आले तर, ग्राहकाने इंजेक्शन 5 हा फॉर्म भरून द्यायचा असतो.

– ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरणार त्या दिवसापासून पेनल्टी सुरु होईल.