CBI Recruitment 2020 : CBI मध्ये निघाली ‘सरकारी’ भरती, मिळेल ‘भरघोस’ पगार, असा करा अर्ज, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) मध्ये नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सीबीआयने अनेक पदांवर भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. या भरतीअंतर्गत सल्लागार पदासाठी उमेदवारांची निवड केली जाईल. पात्र आणि इच्छुक उमेदवार 15 जुलै 2020 पर्यंत या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

सीबीआयने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या भरती अंतर्गत निवडण्यात आलेल्या उमेदवारांचे काम ट्रायल प्रकरणांचे निराकरण करण्यात मदत करणे हे असेल. या भरतीसाठी केवळ सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक किंवा त्यावरील पदांचे निवृत्त पोलिस अधिकारीच अर्ज करू शकतात. निवड झाल्यानंतर उमेदवाराचा पगार दरमहा 40000 असेल.

पात्रता

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना सेंट्रल किंवा राज्य पोलिसांत 10 वर्षाचा इन्व्हेस्टीगेशन कार्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा. अधिसूचनेनुसार सीबीआयची नोकरी मिळाल्यानंतर उमेदवार इतरत्र अर्धवेळ नोकरी करू शकत नाहीत. हैदराबाद हे काम करण्याचे ठिकाण असेल.

लेखी परीक्षा किंवा मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. अर्ज करू इच्छिणारे उमेदवार सीबीआयच्या www.cbi.gov.in च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात.