नशेमध्ये ‘टूल्लं’ होती महिला, क्लबमध्ये ‘रईस’जाद्यानं केला रेप, CCTV त घटना ‘कैद’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका नाईटक्लब मध्ये महिला पूर्णतः मद्यधुंद अवस्थेत आहे हे लक्षात घेऊन एका विद्यार्थ्याने महिलेवर बलात्कार केला. एवढेच नाही तर त्याच्या मित्रानेदेखील महिला मद्यधुंद असल्याचा फायदा घेतला आणि तिच्यावर बलात्कार केला. लंडन मध्ये झालेल्या या गॅंगरेप मुळे ब्रिटिश न्यायालयाने इटलीच्या दोन विद्यार्थ्यांना 15 ऑक्टोबर रोजी दोषी घोषित केले आहे.

या घटनेबाबतचा एक CCTV व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात आरोपी फर्डिनान्डो ओरलान्डो आणि लॉरेन्जो कोस्टान्जो महिलेसोबत सेलिब्रेट करत आहेत आणि नंतर तिला मेंटेनन्स रूममध्ये घेऊन जाऊन बलात्कार करत असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे.

या इटलीच्या विद्यार्थ्यांनी बलात्कारानंतर महिलेचे कपडे देखील बदलले होते आणि नंतर तिला टॉयलेटमधे सोडून दोघेही फरार झाले होते. ही घटना होण्याआधी केवळ सहा मिनिटांपूर्वी या मुलांची त्या महिलेशी क्लबमध्ये ओळख झाली होती. या घटनेनंतर महिला गंभीर स्वरूपात जखमी झाली होती. त्यानंतर तीला एक शस्त्रक्रिया देखील करावी लागली होती.

25 फेब्रुवारी 2017 ला घडलेल्या या घटनेबाबत विद्यार्थ्यांनी न्यायालयात हे सांगितले होते की या महिलेने शारिरिक संबंध ठेवण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र अशा प्रकारच्या गुन्ह्यासाठी शिक्षा असतेच असे न्यायाधीशांनी यावेळी सांगितले.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी