31 मार्चनंतर घरगुती ‘गॅस’ सिलेंडरवरील ‘सबसिडी’ बंद करू शकतं केंद्र सरकार

लुधियाना : वृत्तसंस्था – केंद्रीय पेट्रोलियम अणि नॅचरल गॅस मंत्रालय येत्या 31 मार्चनंतर सर्वसामान्यांना घरगुती गॅस सिलेंडरवर दिली जाणारी सबसिडी योजना बंद करणार आहे. महानगरांमधील बहुतांश गॅस एजन्सी चालकांमध्ये याबाबत चर्चा सुरू आहे. डिलर्सचा अंदाज आहे की, मागील 2 वर्षांपासून सरकारकडून घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत प्रति महिना 4 ते 5 रूपयांची वाढ केली जात आहे, जेणेकरून सिलेंडरच्या किमती एका निर्धारित किमतीवर आल्यानंतर सबसिडीची रक्कम बंद करण्याची घोषणा करता यावी.

सध्या पंजाबमध्ये 14 किलो ग्रॅमच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 738 रुपये आहे. तर यावर ग्राहकाला 174.81 ची सबसिडी सरकारद्वारे दिली जाते. सरकारकडून प्रत्येक ग्राहकाला एका वर्षात केवळ 12 गॅस सिलेंडरवरच सबसिडी दिली जाते. याशिवाय अतिरिक्त सिलेंडर घेतल्यास ग्राहकाला सध्याच्या बाजार भावाप्रमाणेच सिलेंडर खरेदी करावा लागत आहे. म्हणजे ग्राहकाला सबसिडीचा लाभ मिळत नाही.