केंद्राकडून ‘बेवड्यां’ची तपशीलवार आकडेवारी, देशात ‘एवढे’ कोटी अट्टल दारुडे !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दारू पिऊन धिंगाणा घालण्याचे प्रमाण जसे दिवसेंदिवस वाढत आहे, तसे अल्पवयीन मुलांकडून नशा करण्याचे प्रमाण चिंताजनक असल्याचे वास्तव उघडकीस आले आहे. देशात किती लोकं दारू पितात याची तपशीलवार माहिती केंद्र सरकारने राज्यसभेत सादर केली आहे.

त्यानुसार देशात १६ कोटी लोकं दारू पितात मात्र त्यातील ६ कोटी लोकं अट्टल दारुडे असल्याचे केंद्राने म्हटले आहे. २०१८मध्ये सामाजिक न्यायमंत्रालयाने व्यसने करणाऱ्या नागरिकांचा आकडा कळावा यासाठी पहिल्यांदाच सर्वेक्षण केले होते. त्यातून ही माहिती उघडकीस आली आहे.

२लाख १११ कुटुंबाच्या आधारे करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात ४ लाख ७३ हजार ५६९ व्यक्तींना व्यसनांविषयी प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानुसार सर्वेक्षणात १६ कोटी लोक दारू पितात तर ३ .१ नागरिक भांगेचे सेवन करतात असे दिसून आले तर २ .२६ कोटी नागरिक अफूच्या आहारी गेल्याचे नमूद करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात १० ते ७० वयोगटामध्ये दारू व अन्य अंमली पदार्थाचे सेवन करण्याचे प्रमाण जास्त दिसून आले. विशेष म्हणजे यात अल्पवयीन मुलांचे प्रमाण चिंताजनक असल्याचेही आढळून आले.

पावसाळ्यात पायांना पडणाऱ्या भेगांपासून ‘अशी’ घ्या पायाची काळजी

‘नासलेलं दूध’ही आहे सौंदर्यवर्धक ; जाणून घ्या फायदे

काय सांगताय ! मेहंदी केवळ ‘सौंदर्यच’ नाही तर ‘आरोग्यही’ खुलवते

दाभोलकर, पानसरे यांची हत्या म्हणजे मतभेदाचा ‘आवाज’ बंद करण्यासाठी केलेले कृत्य – न्यायालय

घुसमट झाल्यामुळेच ‘वंचित’ मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला : लक्ष्मण माने