इतर पक्ष जरी संपर्कात असले तरी ‘मी’ युती सरकार सोबतच राहणार : रामदास आठवले

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन- इतर पक्ष जरी संपर्कात असले तरी माझे त्यांच्याशी मैत्रीचे संबध आहे. ‘मी युती सरकार सोबतच राहणार आहे. कारण मोदी सरकारने सर्व सामान्यासाठी चांगले निर्णय घेतले आहेत. माझा वेगळा निर्णय घेण्याचा कोणता ही विचार नाही असे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. दरम्यान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले नाशिक दौऱ्यावर होते. त्यावेळी, पुलवामा येथील सीआरपीएफ जवानाच्या बसवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात कारवाई करत भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथील जैश – ए – मोहम्मदचे प्रशिक्षण केंद्र उद्वस्त केले होते . देशाने हवाई दलाच्या या कारवाईचे कौतुक केले आहे. मात्र विरोधी पक्ष या कारवाईवर शंका उपस्थित करुन राजकारण करत आहेत. कारवाईवर शंका उपस्थित करणे चुकीचे आहे. अशा परिस्थिती सर्वानी एकत्र राहणे अपेक्षित आहे. असे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

याचबरोबर, ‘विरोधक दहशतवादी मारल्याची यादी मागत आहे. ती यादी देण्यात आमचे सरकार सक्षम आहे. पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना सोडण्याचा योग्य निर्णय घेतला. मात्र पाकिस्तानने आधी दहशत वाद मिटवावा मग भारताशी मैत्री करावी.’ असेही त्यांनी म्हंटले.

याचदरम्यान, इतर पक्ष जरी संपर्कात असले तरी माझे त्याच्याशी मैत्रीचे संबध आहे. ‘मी युती सरकार सोबतच राहणार आहे. कारण मोदी सरकारने सर्व सामान्यासाठी चांगले निर्णय घेतले आहेत. माझा वेगळा निर्णय घेण्याचा कोणता ही विचार नाही. युतीच्या जागावाटपात मी ईशान्य मुबईसह आणखी एक जागा मिळण्याची मागणी करणार आहे. येत्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याची भेट घेऊन चर्चा करणार आहे.’ असे म्हणत त्यांनी युती सोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.