चाकण मध्ये 2 खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – व्याजाच्या घेतलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम वसूल करूनही तेरा एकर जमीन बळकावून, जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोन खासगी सवकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी ( दि. 13 ) रात्री उशिरा चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी नंदा प्रताप खांडेभराड (रा. कडाची वाडी, ता. खेड, पुणे) यांनी फिर्याद दिली. तर धीरज धनाजी पठारे व उमेश उर्फ दादा खंडू खांदवे ( दोघेही रा. खराडी, पुणे ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदा व त्यांचे पती प्रताप खांडेभराड यांना 10 टक्के व्याज दराने दिलेले 1 कोटी 20 लाख रुपयांचे 12 लाख रुपये प्रती महिना या प्रमाणे 15 महिने व्याजापोटी 1 कोटी 80 लाख व त्यानंतर ३१ लाख रुपये असे 2 कोटी 11 लाख रुपये व्याज वरील दोघांनी जबरदस्तीने घेतले. रांजणगाव, ढोक सांगवी येथील 13 एकर जमीन धमकावून खरेदीखत करून घेतले.

त्याचप्रमाणे वरील दोघांनी वेळोवेळी खांडेभराड यांना चाकण येथील घरी येऊन शिवीगाळ, दमदाटी करून व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार चाकण पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. तपास चाकण पोलीस करत आहेत.

Visit : Policenama.com