अबब ! ‘या’ कारणामुळं पोलिसांनी बैलगाडी मालकालाचं केले ‘चलन’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – नवे वाहतूक नियम लागू झाल्यानंतर दंडामुळे लोक हैराण झाले आहेत. आता तर पोलिसांनी चक्क बैलगाडीचेच चलन कापले आहे. उत्तर प्रदेशच्या बिजनोर जिल्ह्यातील साहसपूर भागात ही घटना घडली. येथे पोलिसांनी बैलगाडीच्या मालकांनाच दंड ठोठावला, परंतू त्याची बैलगाडी त्याच्याच शेताच्या बाजूला उभी होती.

उपनिरिक्षक पंकज कुमार यांच्या नेतृत्वात पोलिसांची एक टीम पेट्रोलिंग करत होती. तेव्हा त्यांना एक बैलगाडी दिसली ज्याच्या आजूबाजूला कोणीही उपस्थित नव्हते. पोलिसांना चौकशी केल्यावर काळले की ही बैलगाडी रियाज हसन यांची आहे, जे तिथे उपस्थित नव्हते.

त्यानंतर पोलिसांची एक टीम बैलगाडी घेऊन हसन यांच्या घरी पोहचली आणि विमा नसलेल्या वाहन दंड मोटर कायद्याच्या सेक्शन 81 अंतर्गत हसन यांना 1 हजार रुपयांचा दंड ठोठावला.

त्यानंतर हसन यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना विचारले की माझ्याच शेताबाहेर बैलगाडी लावली असेल तर माझ्यावर दंड कसा ठोठावला जाऊ शकतो. त्यानंतर रविवार दंड रद्द करण्यात आला.
1 सप्टेंबरपासून नव्या वाहतूक नियमांने दंडाच्या रक्कमा आवाच्या सव्वा वाढवल्या आहेत. वाहनांच्या किंमतीपेक्षा जास्त दंड आकारला जात आहे.

6 लाख रुपयांपर्यंतचे दंड ठोठावल्याचे प्रकार घडले आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांकडून वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्यानंतर देखील दंड ठोठावण्यात येत आहे.

You might also like