home page top 1

चंद्रबाबू नायडूंचा जगनमोहन रेड्डींवर ‘घणाघात’, म्हणाले – ‘सायको सारखं काम करतायेत मुख्यमंत्री’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी पुन्हा एकदा वायएसआर काँग्रेस आणि मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर निशाणा साधला. चंद्राबाबू नायडू यांनी आरोप लावला की वायएसआरसीपीचे सरकार जनतेविरोधी धोरणे राबवत आहेत. नायडूने आरोप लावला की सरकार विरोधी पक्ष आणि नेत्यांवर हा अनावश्यक आणि अवैध प्रकरणं दाखल करत आहे. नायडू म्हणाले की मी त्यांच्यासाठी चांगला आहे जे माझ्यासाठी चांगले आहेत. जगनमोहन रेड्डी एका सायको प्रमाणे काम करत आहेत.

चंद्राबाबू नायडू म्हणाले की मी या आधी देखील अनेक मुख्यमंत्रांना पाहिले आहे परंतू जगनमोहन सारखे कोणाला नाही पाहिले. त्यांनी सरकारला आपला मनमानी कारभार थांबवण्याची चेतावणी देत सांगितले की सरकारने त्यांच्या पार्टीच्या नेत्यांना त्रास देणे बंद करावे. ते म्हणाले की हे योग्य नाही.

सरकारने आंध्र प्रदेशाची राजधानी अमरावतीमध्ये नागरिक प्रशासनाकडून कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या अनाधिकृत निर्मितीला ध्वस्त करण्याची कारवाई करत आहे. या कारवाईवरुन हे मानले जाऊ शकते की माजी मुख्यमंत्री आणि टीडीपीचे अध्यक्ष एन चंद्रबाबू नायडू यांच्या निवासस्थानावर देखील हातोडा पडणार आहे. याआधी वंदावल्ली गावातील नायडू यांच्या घराजवळीलच एका टीडीपी नेत्याच्या अनाधिकृत घरावर सरकारने बुल्डोजर चालवला आहे.

175 पैकी 151 जागावर विजयी झाली होती वायएसआर काँग्रेस 
जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाने विधानसभा निवडणूकीत 175 मधील 151 जागांवर विजय निश्चित केला तर चंद्रबाबू नायडू यांची टीडीपी 102 वरुन 23 जागांवर आली. वायएसआर काँग्रेसला 49.9 टक्के मतदान मिळाले तर टीडीपीला 39.2 टक्के मतदान झाले. जगनमोहन रेड्डी यांनी 2009 साली राजकारणात प्रवेश केला होता. त्यांचे वडील अविभाजित आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री देखील होते. त्यांच्या पक्षाला सोनिया गांधींच्या काँग्रेस पक्षाचे समर्थन होते, परंतू 2010 साली जगनमोहन रेड्डी यांनी आपल्या वायएस विजयम्मा बरोबर मिळून काँग्रेसशी गठबंधन तोडले आणि आपला स्वत:चा पक्ष तयार केला.

Visit : Policenama.com

 

Loading...
You might also like