Chandrakant Khaire | …आनंद दिघे असते तर तुला उलटा टांगला असता, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे एकनाथ शिंदेंवर संतापले, म्हणाले – गद्दार संपणार

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Khaire | शिवसेनेचे (Shivsena) धनुष्यबाण पक्षचिन्ह (Dhanushyaban Symbol) निवडणूक आयोगाने (Election Commission) गोठवले आहे. शिंदे गटाने (Shinde Group) धनुष्यबाण गोठवण्याची विनंती यापूर्वीच केली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना दिलासा मिळाला आहे. आयोगाने हा निर्णय दिल्यानंतर राज्यभरातील शिवसैनिक (Shiv Sainik) आणि समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शिवसेना नेते (Shivsena Leader) चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनीसुद्धा अशाच प्रकारे आपला संताप एकनाथ शिंदे आणि भाजपावर (BJP) व्यक्त केला आहे.

 

चंद्रकांत खैरे म्हणाले, एकनाथ शिंदेचा मला भयंकर राग आलाय. या रिक्षावाल्याने इतके पैसे कुठून कमावले? शिवसेना फोडण्याचे काम केले. आनंद दिघे (Anand Dighe) असते तर गद्दारी केल्यामुळे तुला उलटा टांगला असता. आनंद दिघेंच्या नावावर हे सगळे करतोय. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा भविष्यात विजय होणार आहे. ज्यांनी गद्दारी केली ते संपले हा इतिहास आहे, अशा शब्दात खैरे यांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.

 

खैरे (Chandrakant Khaire) म्हणाले की, माझ्या शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण कायम राहणार आहे. शिंदेंना धनुष्यबाण मिळू शकत नाही. केंद्रात मोदी सरकार (Modi Government) आहे ते हे करणार असेल तर 2024 मध्ये जनता धडा शिकवेल. शिवसेना संपवण्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा मोठा हात आहे. आमच्यासारख्या शिवसैनिकांना बाळासाहेबांनी (Balasaheb Thackeray) मोठे केले. त्याची जाण आम्हाला आहे. गद्दारांना नसेल. परमेश्वर तुम्हाला कधी माफ करणार नाही. संघर्ष, संकटे येतात पण शिवसेना संपली नाही. संपणार नाही. बाळासाहेबांवर अनेक संकटे आली होती.

ते पुढे म्हणाले, आमच्यावर जे संकट आले आहे त्याचा सामना करणार आहोत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे संयमी आणि संघर्षमय नेतृत्व आहेत. त्यामुळे आम्ही संघर्ष करत राहू. एकनाथ शिंदे आणि 40 गद्दारांनी शिवसेना फोडण्याचे महापाप केले आहे. अनेक शिवसैनिक दुखावले गेले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पुन्हा एकदा संघर्ष करू आणि जिंकून येऊ असा पण केला आहे.

 

खैरे म्हणाले, मी रात्रभर झोपलो नाही. देवा हे काय केलंस तू? बंदोबस्त कर देवा. ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी ते संपणार आहेत.
निवडणूक आयोग यंत्रणा केंद्राच्या हातात आहे. हा लोकशाहीचा खून आहे. अंधेरी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.
त्याठिकाणी शिवसेनेचा उमेदवार जिंकून येणारच. साधा रिक्षावाला कोट्यवधी रुपये छापले.
उद्धव ठाकरेंनी केवळ हात वर केला. याचे परिणाम भयानक होतील. भाजपा कुठेही दिसणार नाही.
एकनाथ शिंदे संपणार आहे, असे खैरे म्हणाले.

 

Web Title :- Chandrakant Khaire | shivsena ex mp chandrakant khaire targeted cm eknath shinde

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrakant Khaire | मोदींच्या हातात सर्व यंत्रणा, देवेंद्र फडणवीसांनी हा सगळा डाव रचलाय, चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप!

Pune Crime | दत्तवाडी परिसरात रिक्षा चालकाचा खून करणार्‍या तिघांना अटक

MP Supriya Sule | ‘हम बेवफा हरगीज ना थे, पर…’ सुप्रिया सुळेंचा टोला, म्हणाल्या-‘मला शिंदे गटाची काळजी वाटते’