Chandrakant Patil Birthday | चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वारकऱ्यांना ‘औषध पेटी’चे वाटप; संदीप खर्डेकर मित्र परिवाराचा सुत्य उपक्रम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil Birthday | भाजपचे नेते (BJP) आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा शनिवारी (दि.10) वाढदिवस आहे. चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवसानिमित्त (Chandrakant Patil Birthday) संदीप खर्डेकर मित्र परिवाराच्या (Sandeep Khardekar) वतीने वारकऱ्यांना औषध पेटीचे वाटप करण्यात येणार आहे. चंद्रकांतदादांच्या वाढदिवसानिमित्त वारकऱ्यांना (Warkari) औषध पेटीचे वाटप केले जाणार असल्याची माहिती संदीप खर्डेकर (Sandeep Khardekar) यांनी दिली.

 

जगद्गुरू संत तुकाराम महाराज (Jagadguru Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala) आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज (Shri Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala) यांचा पालखी सोहळा सोमवारी (दि.12) पुण्यनगरीत दाखल होणार आहे. यावेळी रुग्ण हक्क आंदोलन करण्यात येणार असून या अंतर्गत वारकऱ्यांना औषध पेटीचे वाटप केले जाणार आहे. संदीप खर्डेकर मित्र परिवाराच्या वतीने हा सुत्य उपक्रम राबवला जात असून याचा फायदा अनेक वारकऱ्यांना मिळणार आहे. या उपक्रमाची संकल्पना संदीप खर्डेकर यांची आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त (Chandrakant Patil Birthday) वारकऱ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या ‘औषध पेटी’
उपक्रमासाठी विजय सरोदे, राहुल जानवेकर, नितिन धनगर, अश्वजित कांबळे, संदिप भिसे, उमेश कांबळे, सचिन पुटोल, मंगेश सोनावणे,
सागर जाना विनोद सोनवणे, नितीन खरात, नागेश भिसे, नागनाथ जानवेकर यांनी परिश्रम घेतले आहेत.

 

Advt.

Web Title :  Chandrakant Patil Birthday | Distribution of ‘medicine box’ to warkari on the occasion of
Chandrakant Patil’s birthday; initiative of Sandeep Khardekar Mitra Parivar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा