Chandrakant Patil | ‘पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहणाऱ्या पक्षाला जे जमलं नाही ते भाजपनं करून दाखवलं’ – चंद्रकांत पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil | भाजपच्या वतीने पुण्यात (Pune) काल (रविवारी) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) बोलत होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष आणि खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. ‘पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहणाऱ्या पक्षाला जे जमलं नाही ते भाजपने (BJP) महाराष्ट्रात करून दाखवलं.’ असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

 

‘2014 च्या निवडणुकीत पहिल्यांदाच एखाद्या पक्षाला 100 पेक्षा जास्त आमदार निवडून आणता आले. 2019 मध्ये देखील 105 आमदार निवडून आले. देशाचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पक्षालाही या महाराष्ट्रात 60 च्या वर आमदार निवडून आणता आले नाही. देशात अनेक वर्ष राज्य केलेल्या काँग्रेसलाही 70 पेक्षा जास्त आमदार निवडून आणता आले नाही. आणि नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) नावावर मते मागून धोका देणाऱ्या शिवसेनेलाही 73 च्या वर आमदार निवडून आणता आले नाही. परंतु भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांनी बूथ संपर्क योजनेच्या जोरावर 100 हुन जास्त आमदार निवडून आले.’ असं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.

 

 

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘हे बूथ संपर्क अभियान भाजप पक्ष (BJP) पुण्यात अशा प्रकारे राबविली की
संपूर्ण महाराष्ट्रातील भाजपच्या कार्यकर्त्यांना यामुळे दिशा मिळेल.
महाराष्ट्रातील 98 हजार बूथवरील कार्यकर्ते 30 लाख कार्यकर्त्यांनी प्रत्येकी 10 लोकांची जरी मत मिळवली
तरी 3 करोड मतं भाजपला मिळतील. महाराष्ट्रात जेव्हा एखादा पक्ष 2 करोड मत घेतो तेव्हा तो 144 जागा जिंकतो.
त्यामुळे आगामी निवडणुकीत आम्ही एकटे लढू, 160 जागा जिंकत महाराष्ट्रात सरकार स्थापन करू.

 

Web Title :- Chandrakant Patil | bjp did what party dreaming becoming prime minister did not get said bjp leader chandrakant patil on ncp

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा