Chandrakant Patil | ‘काही नवीन आलं की माझ्या डोक्यावर टाकलं जातंय’ – चंद्रकांत पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil | काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांच्याकडे असलेले पुण्याचे पालकमंत्रीपद काढून घेऊन ते राष्ट्रवादीच्या अजित पवारांकडे देण्यात आले. पालमंत्रीपद गेल्यानंतर चंद्रकांत पाटील यांची खदखद आता बाहेर आली आहे. मला पालकमंत्री म्हणून अतिशय जवळचे दोन जिल्हे देण्यात आले, काही नवीन आलं की माझ्या डोक्यावर टाकलं जातंय असं विधान त्यांनी केलं. पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (DES Pune) एका कार्य़क्रमात ते बोलत होते. (Chandrakant Patil)

पालकमंत्री पदावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, मला पालकमंत्री म्हणून अत्यंत जवळचे दोन जिल्हे दिले आहेत. सोलापूर इथून दहा किलोमीटर, तिथून अमरावती पाच किलोमीटर, पुणे तिथून अर्धा किलोमीटर आणि कॅबिनेटच्या बैठकीला मुंबईत येण्यासाठी शून्य किलोमीटर. असं काही माझ्याबद्दल गेल्या 40-45 वर्षात केलंय. काही नवीन आलं की माझ्या डोक्यावर टाकलं जातंय. (Chandrakant Patil)

अजित पवार सत्तेत सामील झाल्यापासून त्यांनी पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रह केला होता. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांना सोलापूर आणि अमरावती या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद देण्यात आले. पालकमंत्रीपदाच्या या बदलानंतर चंद्रकांत पाटील हे नाराज असल्याची चर्चा होती. परंतु काही मोठ्या गोष्टी साध्य करण्यासाठी आपण पुण्याच्या पालकमंत्रिपदाचा त्याग करत असल्याचे त्यांनी सांगितले होते. आता गमतीने का होईना त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bhidewada Smarak Issue Solved | ‘भिडेवाडा स्मारका’चा प्रश्न निकाली! सुप्रीम कोर्टातील खटला
पुणे महापालिकेने जिंकला

Bhide Wada Smarak | ऐतिहासिक भिडे वाड्यातील ‘स्मारकाचा’ मार्ग मोकळा; भूसंपादनाशी निगडीत दीर्घ काळ प्रलंबित असलेल्या खटल्याचा निकाल महापालिकेच्या बाजूने

Meera Borwankar Explation On Ajit Pawar | ‘अजित पवारांनी लिलाव केला नाही, हे सत्य, पण…’, मीरा बोरवणकर यांनी दिले स्पष्टीकरण

Gopichand Padalkar On Sharad Pawar | गोपीचंद पडळकरांनी नाव न घेता पुन्हा शरद पवारांना डिवचले, म्हणाले…

Chiplun Flyover Bridge Broke | बांधकाम सुरू असताना उड्डाण पुलाचे गर्डर तुटले, मोठ्या आवाजामुळे नागरिकांची पळापळ

Pune Crime News | मंडपातील पांढऱ्या कपड्यावरुन उठण्यास सांगितल्याने तरुणावर वार, गंज पेठेतील घटना; सराईत गुन्हेगाराला अटक