
Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील म्हणाले – 5 ते 10 वर्ष अजून काम करुन जायचंय, निवृत्तीची चर्चा
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil | पुढील शंभर वर्षांची दृष्टी आपल्याकडे नाही, आणि आपल्याला त्यात रसही नाही. कारण आपल्याला अजून 5-10 वर्ष काम करुन जायचंय, असे वक्तव्य भाजपा नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुणे येथे केले. यानंतर चंद्रकांत पाटील पुढील पाच वर्षात निवृत्त होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. ते पुण्यातील एसएनडीटी विद्यापीठात (SNDT University) आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आपल्या भाषणात म्हणाले, कुठलाही रिझल्ट समोर घ्या, त्यामध्ये 60-70-65 टक्के महिला दिसतात, त्या खूप सिन्सिअरली आणि सँक्टिटी म्हणू शकतो… पावित्र्याने बघतात कुठल्याही गोष्टीकडे, याचीच जगाला आणि भारताला गरज आहे. सिन्सिअॅरिटीची पण आवश्यकता आहे आणि सँक्टिटीचीही. ती महिलांमध्ये पुढील 100 वर्ष तरी टिकेल, त्यानंतर कालचक्र फिरेल, त्यावेळेला कोण करेल माहिती नाही, मला त्याचे व्हिज्युअलायझेशनही नाही आणि इंटरेस्ट पण नाही, कारण आपल्याला अजून 5-10 वर्ष काम करुन जायचंय. त्यामुळे कालचक्रामध्ये 100 वर्ष आता महिला साम्राज्य करणार, असे भाकीत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सरकारमध्ये महसूल मंत्री राहिलेल्या चंद्रकांत पाटील यांचा राजकीय क्षेत्रामधील प्रवास 2004 पासून सुरु झाला. त्यांनी सलग 13 वर्षे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. ते भाजपचे (BJP) एकनिष्ठ आणि मराठा चेहरा म्हणून ओळखले जातात. गिरणी कामगाराचा मुलगा ते दुसर्यांदा कॅबिनेट मंत्री (Cabinet Minister) असा त्यांचा प्रवास आहे. ते सध्या फुटीर एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde Group) आणि देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत.
चंद्रकांत पाटील यांचा जन्म 11 जून 1959 रोजी एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला.
मुंबईतील गिरणगावात त्यांचे बालपण गेले. वयाच्या 18व्या वर्षापासूनच त्यांनी कामाला सुरूवात केली.
गिरणी कामगाराचा मुलगा ते राज्यातील सर्वात मोठ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.
Web Title :- Chandrakant Patil | cabinet minister bjp leader chandrakant patil speech in pune sndt sparks speculation about retirement
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune News | कारागृहातील भगिनींनी लुटला भोंडल्याचा आनंद
Shobha R Dhariwal | विद्यार्थ्यांना संगणकाचे तांत्रीक प्रशिक्षण मिळणे काळाची गरज – शोभा आर धारीवाल