Chandrakant Patil | शाईफेकीच्या घटनेनंतर चंद्रकांत पाटील म्हणाले -‘मी कुणाला घाबरत नाही, हिंमत असेल, तर…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर आज पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरामध्ये शाईफेक (Ink Throwing) करण्यात आली. चिंचवड गावातील एका कार्यकर्त्याच्या घरी आले असताना हा प्रकार घडला. या घटनेनंतर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची प्रतिक्रिया आली आहे.

 

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, मी कार्यक्रमाला चाललो आहे. मी सर्व कार्यक्रम करणार आहे. मी कुणाला घाबरत नाही. अशा प्रकारे पराचा कावळा करणं, दिलगिरी व्यक्त केली असताना असा भ्याड हल्ला करणं चुकीचं आहे. हिंमत असेल तर समोरून या. सगळं पोलीस डिपार्टमेंट बाजूला करतो, असे ते म्हणाले.

 

ते म्हणाले, ही झुंडशाही आहे. ही झुंडशाही महाराष्ट्र शासन (Government of Maharashtra) सहन करणार नाही. याचं जे काही आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाहतील. आज आम्ही आमच्या कार्य़कर्त्यांना खुली छूट दिली असती तर काय झालं असतं. मात्र, ही आमची संस्कृती नाही. शब्दाला शब्दाने टक्कर देता येते. मी काल आणि आजही दिलगिरी व्यक्त केली. गिरणी कामगाराचा मुलगा या स्टेजपर्यंत जाणं सरंजामी लोकांना झेपत नाही. त्यामुळे हे भ्याड हल्ले चालले आहेत. उद्यापासून पोलीस प्रोटेक्शनही नसेल, हिंमत असेल तर या समोरून या, असं पाटील म्हणाले.

हे चुकीचे पायंडे पडलेले आहेत. पोलिसांना दोष देण्याचे कारण नाही. पोलिसांनी कुणाकुणावर लक्ष द्यायचं.
कार्य़कर्ता कोण आणि बदमाश कोण हे कळणार कसं. देवेंद्रजींनाही (Devendra Fadnavis) मी सांगितलं आहे की,
कुणावरही कारवाई करू नका. मी सर्व कार्यक्रमाला जाणार आहे. बघू कोण काय करतंय, या समोर.
हा बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा अपमान आहे.
पैठणमध्ये जे बोललो त्याचा विपर्य़ास केला आहे. मात्र, पराचा कावळा केला गेला,
लोकसहभागातून शाळा उभारल्या असं म्हणण्याऐवजी मी ग्रामीण भाषेत बोललो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

 

Web Title :- Chandrakant Patil | chandrakant patil reation after ink throwing at pimpari chinchwad pune controversial statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Lonavala Local | कामशेत स्थानकाच्या कामामुळे पुणे लोणावळा मार्गावरील अनेक लोकल रद्द

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार ९५,०००!; मोदी सरकारची नववर्षातील भेट

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध; MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 89 जणांवर कारवाई