Chandrakant Patil – Kothrud Pune News | ना आश्वासन, ना तारीख थेट संवाद द्वारे जागेवर निर्णय; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा कोथरुडमधील उपक्रमाचा तिसरा टप्पा

कोथरुड (पुणे) : पोलीसनामा ऑनलाइन –  Chandrakant Patil – Kothrud Pune News | पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ‘थेट भेट’ उपक्रमाच्या माध्यमातून आज कोथरुडमधील थोरात गार्डन (Thorat Garden Kothrud) येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी मांडलेल्या समस्यांवर ना आश्वासन, ना तारीख थेट जागेवर निर्णय देत नागरिकांच्या समस्यांचे निराकरण केले. (Chandrakant Patil – Kothrud Pune News)

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरुडमधील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी थेट भेट उपक्रम सुरू केला असून, आज या उपक्रमातील तिसऱ्या टप्प्यातील कार्यक्रम कोथरुडमधील थोरात गार्डन येथे झाला. यावेळी उद्यानात येणाऱ्या नागरिकांनी आपल्या तक्रारी नामदार चंद्रकांत पाटील यांच्या समोर मांडल्या. (Chandrakant Patil – Kothrud Pune News)

Chandrakant Patil - Kothrud Pune News | Neither promise, nor date decided on the spot by direct communication; Guardian Minister Chandrakant Patil's third phase of the initiative in Kothrud
File Photo

 

यात प्रामुख्याने लहान मुलांसाठी बालनाट्याचा कार्यक्रमाचे आयोजन, उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर उद्यानातील डायनासोर पुन्हा कार्यान्वित करणे, स्वच्छता गृहातील दिवे यांसह टवाळखोर तरुणांवर चाप बसवणे आदी समस्या मांडल्या. कोल्हापूरच्या धर्तीवर कोथरुड मधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या (Yashwantrao Chavan Natyagruha Pune) टेरेसवर तारांगण उभारावे, अशी अपेक्षा काही नागरिकांनी व्यक्त केली.

 

Chandrakant Patil - Kothrud Pune News | Neither promise, nor date decided on the spot by direct communication; Guardian Minister Chandrakant Patil's third phase of the initiative in Kothrud
File Photo

 

 

त्यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सर्व समस्या निवारण करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.
तसेच यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या टेरेसवर तारांगण साकारण्यासाठी आयुक्तांशी चर्चा करुन त्याची अंमलबजावणी करु,
अशी ग्वाही दिली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यतत्परतेवर नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

 

Web Title :- Chandrakant Patil – Kothrud Pune News | Neither promise,
nor date decided on the spot by direct communication; Guardian Minister Chandrakant Patil’s third phase of the initiative in Kothrud

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर तिन्ही पक्षांचे एकमत, मविआच्या बैठकीनंतर
जयंत पाटलांची माहिती

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : लोणीकंद पोलिस स्टेशन – 3 हजार रूपयांसाठी संगणक अभियंत्याचा खून
करणार्‍या कॅब चालकाला अटक; जाणून घ्या मर्डरची स्टोरी

Koregaon Park Police Station | पुण्यातील उच्चभ्रू परिसर कोरेगाव पार्कमध्ये नेमकं चाललंय काय? भलतेच उद्योग !

Jayant Patil | ‘कायदा व सुव्यवस्था राखणं पोलीस दलाचं काम पण…’; अमोल कोल्हेंच्या ‘त्या’ आरोपांवरुन जयंत पाटलांचा
गृहमंत्र्यावर निशाणा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti | पुढील वर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंती शासनाच्यावतीने मोठ्या
प्रमाणात साजरी करणार; किल्ले पुरंदर येथील शासकीय जयंती कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा