Chandrakant Patil On Mahavikas Aghadi Govt | चंद्रकांत पाटलांचा सूचक इशारा; म्हणाले – ‘महाविकास आघाडीमधील मंत्र्यांनी बॅगा भरून ठेवाव्या’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil On Mahavikas Aghadi Govt | भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुन्हा एकदा राज्यातील महाविकास आघाडीमधील (Maha Vikas Aghadi Government) नेत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी बॅगा भरून ठेवाव्यात. आता कोणाचाही नंबर लागू शकतो,’ असा सूचक इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. (Chandrakant Patil On Mahavikas Aghadi Govt)

 

त्यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ”माझ्या वक्तव्याची महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वारंवार चेष्टा केली जातेय.
मात्र, सगळी चेष्टा त्यांच्या अंगलट येणार असून, मी जे म्हणत गेलो तेच होत गेले.
जे जात्यात होते त्यांचे पीठ झाले आणि जे सुपात होते ते आता जात्यात जात आहेत.
त्यामुळे महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी बॅगा भरून ठेवाव्यात. आता कोणाचाही नंबर लागू शकतो.”

 

पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले, ”राज्य सरकार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नव्हे, तर अजित पवारच (Ajit Pawar) चालवतात, ही वस्तुस्थिती आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना परवा विधिमंडळात विनंती केली.
कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची धमक फक्त त्यांच्याकडेच आहे. ते धाडसी आहेत, बाकीचे सगळे भेकड आहेत.”

दरम्यान, शिवसेना (Shivsena) पदाधिकारी यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरी सक्तवसुली संचालनालयाला (ED) सापडलेल्या डायरीमध्ये ‘मातोश्री’ला दोन कोटी व 50 लाखांचे घड्याळ दिल्याचा उल्लेख असल्याबाबत विचारले असता, त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, ”ईडी ही स्वायत्त संस्था आहे.
कोणाच्या घरी काय सापडले, त्यात काय आहे हे मला माहिती नाही.
मात्र, खूप काहीतरी होणार आहे, असे दिसते.” असं ते म्हणाले.

 

Web Title :- Chandrakant Patil On Mahavikas Aghadi Govt | ministers in mahavikas aghadi should fill their bags chandrakant patil in kolhapur

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा