Chandrakant Patil On Thackeray Government | चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाले – ‘लाथ मारायची आणि साॅरी म्हणायचं…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil On Thackeray Government | हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं असल्याचं दिसत आहे. यावरुन सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) आणि भाजप (BJP) यांच्यात मोठी खडाजंगी होत असल्याचं दिसत आहे. मशिदीवरील भोंग्या संदर्भात आज राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. मात्र भाजपचे कोणेही या बैठकीला उपस्थित राहिले नाही. यावरुन बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर (Thackeray Government) निशाणा साधला आहे. (Chandrakant Patil On Thackeray Government)

 

चंद्रकांत पाटील म्हणाले की, “सर्वपक्षिय बैठकीला आम्ही जाणार नाही. सर्वांनी एकत्र बसून चर्चा करू, निर्णय घेऊ असं वातावरण माहाविकास आघाडी सरकारने ठेवलं नाही, लाथ मारायची आणि सॉरी म्हणायचं अशी वृत्ती महाविकास आघाडीची आहे. तीन दिवस सलग नेत्याच्या गाड्यांवर दगड फेकायची आणि मग म्हणायचं एकत्र बसून चर्चा करू, त्यांना जे करायचं ते करू दे,” असं ते म्हणाले. (Chandrakant Patil On Thackeray Government)

 

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ”सर्व पक्षांनी एकत्र येत तोडगा काढण्याबाबत ते म्हणाले की, “एकत्रित बसण्यामध्ये सिरीअसनेस दिसला पाहिजे, मुख्यमंत्री बैठकीला येणार नाहीत.
या राज्यात 50 वर्ष राजकारण केलं, ज्यांच्या शब्दाला वजन आहे ते येणार नाहीत, मग कोण येणार तर दिलीप वळसे पाटील,
त्यांना मुंबईत निर्णय घेण्यात काही अधिकार आहे? दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) बिचारे आहेत.
मुंबईचे निर्णय मातोश्रीवरून होणार मग, ज्या बैठकीत फक्त चहा बिस्कीटं खाल्ली जाणार तिथं जाण्याचं काही कारण नाही” असंही ते म्हणाले.

दरम्यान, राज्यात राष्ट्रपती लागवट लावण्याबाबत राज्यपाल ठरवतात, आम्ही कुठली मागणी धरली नाही.
तसेच त्यांनीच (मविआ) राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचा आरोप करत पोलीस स्टेशन समोर आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला होतो,
फुटेज तपासल्यानंतर पोलीस या निष्कर्षापर्यंत आले आहेत, हे पोलिसांच्या समोर झालं असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Chandrakant Patil On Thackeray Government | BJP leader chandrakant patil criticized the mahavikas aghadi government over all party meet regarding loudspeaker row

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sharad Pawar On Amruta Fadnavis | मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेवरून पवारांनी अमृता फडणवीसांना फटकारलं; म्हणाले…

 

Pune Crime | धायरीत गुंडांच्या टोळक्याचा हैदोस, तरुणांना कोयत्याचा धाक दाखवून लुबाडले; मोटारीच्या काचा फोडून पसरविली दहशत

 

Pune Crime | मसाज सेंटरच्या नावाखाली भलतेच उद्योग सुरू ठेवणारा स्पा सेंटरचा मालक मनिष मुथा ‘गोत्यात’