Chandrakant Patil – Pune Hadapsar News | ‘कोल्हे-तुपे यांची पोपटपंची, काम शून्य’ – चंद्रकांत पाटील

प्रमोद भानगिरे मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले - पालकमंत्री

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil – Pune Hadapsar News | भाजप-शिवसेना सरकारने (BJP Shivsena Govt) सत्तेवर येताच मेट्रो (Pune Metro), पाणी, रस्ते, आरोग्याच्या कामासाठी भरीव निधी देऊन विकासकामांचा झपाटा सुरू केला आहे. कोल्हे-तुपे यांची पोपटपंची काम शून्य अशी खरमरीत टीका पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. यावेळी प्रमोद भानगिरे (Pramod Nana Bhangire) मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले सांगताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. (Chandrakant Patil – Pune Hadapsar News)

 

हांडेवाडी रस्ता (Handewadi Road) येथील श्रीराम चौकामध्ये मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीतून कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे भूमीपूजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil), माजी आमदार योगेश टिळेकर (Yogesh Tilekar), शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास तुपे, माजी नगरसेवक मारुती तुपे, शिवसेना नेते काका पवार, योगेश जोशी, संतोष रजपूत, विकी माने, महिला अध्यक्ष पूजा रावेतकर, युवा सेनाशहर प्रमुख निलेश गिरमे, भाजप नेते भूषण तुपे, इम्तियाज मोमीन, योगेश सूर्यवंशी, माजी नगरसेविका उज्ज्वला जंगले,विजया वाडकर,महिला नेत्या सारिका पवार, शोभा लगड, अश्विनी सूर्यवंशी, ज्योत्साना सातव, अभिमन्यू भानगिरे, संतोष भानगिरे, विकास शेवाळे, योगेश सातव, नाना तरवडे, माउली भानगिरे आदी उपस्थित होते.

शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे म्हणाले की, मुख्यमंत्री विशेष निधीतून मागिल अकरा महिन्यामध्ये रस्ते, ड्रेनेज, पाणी, आरोग्य अशी अनेक कामे मार्गी लावली. शहराबरोबर उपनगराचाही विकास झाला पाहिजे, त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सतत पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. नाना भानगिरे टीम आणि शिवसैनिकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

 

Web Title :  Chandrakant Patil – Pune Hadapsar News | Chandrakant Patil On MP Amol Kolhe And
MLA Chetan Tupe At Pramod Nana Bhngire Program

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा