Manisha Kayande | शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मनिषा कायंदेंची पहिली प्रतिक्रिया, ठाकरे गटावर गंभीर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे गटाच्या (Thackeray Group) नेत्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केला. हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान शिवसेना (Shivsena) शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहेत. माझी गरज उरली नाही, हे गेल्या काही महिन्यांपासून दिसत होतं. महिला आघाडीची कुचंबना होत असतानाही कोणी बोलत नव्हत, असा आरोप कायंदे यांनी केला.

 

मनिषा कायंदे (Manisha Kayande) पुढे म्हणाल्या, मी 2012 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. ती बाळासाहेबांनी (Balasaheb Thackeray) स्थापन केलेली शिवसेना होती. आताही मी शिवसेनेतच आहे. नेतृत्वात बदल झालाय हे खरं आहे. एकनाथ शिंदेंकडे (Eknath Shinde) अधिकृत शिवसेना आहे. त्यामुळे मी शिवसेनेतच आहे. पक्षबदल केलेला नाही, असं त्यांनी सांगितले.

 

भाजपात असतानाही शिवसेनेचं काम केलं

माध्यमाशी बोलताना कायंदे यांनी मोठं विधान केलं आहे. आपण भाजपात (BJP) होतो, तेव्हाही शिवसेनेचं काम केल्याचं कायंदे यांनी सांगितलं. माझा राजकीय प्रवास खूप मोठा आहे. मी पूर्वी 25 वर्ष भाजपमध्ये काम केलं. सर्वात आधी मी मतदार म्हणून शिवसेनेलाच मतदान केलं. नारायणराव आठवले (MP Narayan Rao Athawale) मध्य दक्षिण विभागातून शिवसेनेच्या तिकीटावर खासदार झाले. त्यानंतर मनोहर जोशी (Manohar Joshi) सर, विद्यमान खासदारांच्या दोन टर्म असा पूर्ण काळ होता. त्यामुळे मी जरी भाजपात होते तरी निवडणुकीच्या वेळी मी सातत्याने शिवसेनेचंच काम केलं. शिवसेनेची व भाजपाची विचारधारा समसमानच होती. त्यामुळे भाजपातून शिवसेनेत आले तेव्हा माझी विचारधारा तीच राहिली असंही कायंदे यांनी सांगितले.

 

ती माझी खंत होती

माझी गरज उरली नाही, हे गेल्या काही महिन्यांपासून दिसत होतं. संघटनात्मक काम करण्याचा माझा पिंड आहे.
पक्षानं मला मान सन्मान दिला. मी पक्षाची भूमिका मांडली. आता पक्षाची विचारधारा भरकटत आहे.
माझी अजून एक वर्ष टर्म आहे. संघटनेत चांगले पद द्या एवढीच माझी मागणी होती.
पण मला छत्रपती संभाजीनगरमध्ये जबाबदारी दिली आणि त्यानंतर एक ज्युनियर माझ्या डोक्यावर बसवला.
मला मनमोकळेपणानं बोलू द्या, काम करण्याची संधी द्या, हे मी अनेकांना सांगितलं. मात्र पक्षाच्या निर्णयामध्ये आम्हाला कुठेच स्थान नव्हते,
अशा शब्दात मनिषा कायंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) कार्यपद्धतीवर टीका केली.

 

 

Web Title :  Manisha Kayande | shivsena leader manishay kayande made serious allegations against the thackeray group

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा