Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचा खडसेंना सूचक सल्ला; म्हणाले – ‘ …तर एका क्षणात ईडी आणि सीबीआय थांबतील’

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrakant Patil | केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या अटक नाट्यानंतर ईडीने शिवसेना नेते, परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना नोटीस बजावली तर खासदार भावना गवळी (Shivsena MP Bhavana Gawali) यांच्या कार्यालयावर ईडीने (ED) छापे मारले.त्यानंतर महाविकास आघाडीने भाजपवर टीकेची सोड उठवली आहे. त्या पार्श्वभूमीवर सांगली येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील ईडी आणि सीबीआय कारवाईवर भाष्य केलं आहे.त्याचबरोबर एकनाथ खडसेंबाबत (Eknath Khadse) सूचक वक्तव्यही त्यांनी केले. ते म्हणाले, भाजपमध्ये चूक करणाऱ्यावर कारवाई होतेच. मी करेल तर माझ्यावरही होईल. ज्याला कर नाही त्याला डर कशाला नाथाभाऊंनी काही केलं नाहीतर छळण्याचा काय प्रश्न आहे, एका क्षणाला ईडी आणि सीबीआय थांबतील असं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हंटलं आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिली म्हणून काल ढोल वाजवून ढोल फुटले. सायंकाळी सीबीआयने यावर स्पष्टीकरण दिल्यावर सर्वजण चिडीचूप बसले. बहुदा अशा पुड्या सोडणाऱ्यांवर सीबीआय कारवाई करू शकते, असं माझं कायदेशीर मत आहे. त्यांनी करावं का नाही करावं माहीत नाही. परंतु संजय राऊत म्हणतील की, दादांच्या सांगण्यावरून सांगण्यावरून सीबीआय चालते असा टोलाही लगावला.

मी काहीही बोललो तर सामनामध्ये अग्रलेख येईल. त्याच पुस्तक तयार होईल. भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये अंतर करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला गेला. काँग्रेस-राष्ट्रवादीला मंदिर उघडणे चालणार नाही. पण शिवसेनेला चालणार नाही का? का खुर्चीसाठी मंदिरं उघडणार नाही. उद्धव ठाकरे खुर्चीवर प्रेम करणारे आहेत. संजय राऊत शिवाय कोणी बोलताना दिसते का? दिवाकर रावते, अनिल देसाई कुठे गेले हे. कारण ते खरे बोलतायत त्यामुळे त्यांना बोलून दिले जात नाही. पण संजय राऊत यांच्या स्टाईलचे मला कौतुक वाटते’ असा टोलाही पाटील यांनी लगावला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका सर्वांना माहित आहेच तशी काळजी घेण्याचे सर्वांना कळते. त्यामुळे राम कदम म्हणाले नियम द्या त्या नियमाचे पालन करून दही हंडी करू. परंतु, दारूची दुकान चालू आहे, त्याला बोनस म्हणून तीर्थ येतं, पण नियमाच्या चौकटीतून बसून मंदिर सुरू केली पाहिजेत, अशी मागणीही पाटील यांनी केली.

कर्नाटक सरकारने अलमट्टीची उंची वाढवण्यासंदर्भात हालचाली सुरु केल्या आहेत. त्यासंदर्भात
बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, अलमट्टीची उंची वाढणं हे महाराष्ट्रसाठी घातक आहे. महाराष्ट्र
शासनाने याला विरोध करायला हवा. यापूर्वीच उंची वाढवली गेली आहे. त्यात आणखी उंची वाढली
तर लगतच्या गावांना धोका निर्माण होईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

हे देखील वाचा

PhonePe | ‘फोनपे’वर खरेदी करता येईल इन्श्युरन्स पॉलिसी, 30 कोटी लोकांना होईल फायदा; जाणून घ्या

Pune Crime | पुण्यात 2 महिलांची भांडणे पाहणे सुरक्षा रक्षकाला पडले ‘महागात’, जाणून घ्या प्रकरण

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Chandrakant Patil | then ed and cbi probe will stop in a inquiry chandrakant patils advice to eknath khadse

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update