Smriti Irani | ‘बार’वरून स्मृती इराणींच्या वकिलाने काँग्रेसला पाठविली कायदेशीर नोटीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Smriti Irani | भाजपा नेत्या (BJP Leader) स्मृती इराणी यांची मुलगी झोईश इराणी (zoish-irani) गोव्यात (Goa) बनावट लायसन्सद्वारे बिअर बार चालवते, असा आरोप काँग्रेसने केल्यानंतर सोशल मीडियात गोव्यातील सिली सोल्स कॅफे अँड बारवरून मोठी चर्चा सुरू झाल्यानंतर माजी मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेत्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ही नोटीस काँग्रेस पक्ष, जयराम रमेश, पवन खेरा आणि नेटा डिसूझा यांना पाठवली आहे. (Smriti Irani)

 

इराणी यांनी काँग्रेस नेत्यांना पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाने पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांना आमच्या अशिलाला (स्मृती इराणी) आणि त्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य करायचे नाही, तर आमच्या अशिलाला आणि त्यांच्या कुटुंबीयांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे त्यांना उत्तर द्यायचे आहे.

 

नोटीसमध्ये पुढे म्हटले आहे की, काँग्रेसचा आरोप आहे की त्यांची 18 वर्षांची मुलगी जोश इराणी गोव्यात ’सिली सॉल्स कॅफे अँड बार’ नावाचे रेस्टॉरंट चालवते. तिला गोव्याच्या उत्पादन शुल्क विभागाने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. (Smriti Irani)

 

यूट्यूबवर ’स्मृती इराणींचे मौन तोडा’ आणि ’स्मृती इराणींच्या कौटुंबिक भ्रष्टाचाराची गाथा’ आणि इंस्टाग्रामवर शेअर केलेला
’हम अखबार भी चलाते हैं बदनाम’ व्हिडिओ अशा शीर्षकांसह खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करण्यात आली आहे.
हे बदनामीकारक, अपमानास्पद आहे.

स्मृती इराणी यांचे वकील नागरा यांनी म्हटले की, जोईशा त्या बारची मालकीन नाही किंवा ती तो बार चालवत नाही.
तिला अशी कोणतीही नोटीस मिळालेली नाही असेही तिने म्हटले होते. जोईश ही 18 वर्षीय विद्यार्थीनी आहे,
जी शेफ बनण्यासाठी अभ्यास करत आहे. यामुळे ती पाककलेमध्ये पारंगत होण्यासाठी वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये काम करते.

 

अ‍ॅड. नागरा यांनी सांगितले की, काँग्रेसचे वकील आयरिस रॉड्रीग्ज यांना अबकारी आयुक्तांनी नोटीस पाठविली आहे,
त्याची सुनावणी 29 जुलैला होणार आहे. तेव्हा सर्वांनाच समजून जाईल की कोणते भूत हे रेस्टॉरंट चालवत होते.

 

Web Title :- Smriti Irani | zoish irani only does internships in hotels legal notice sent by smriti iranis lawyer to congress on goa bar row

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission | फक्त 12 दिवस आणखी ! सरकारी कर्मचार्‍यांच्या वेतनात वाढतील 27000 रुपये, मोदी सरकार करणार घोषणा

 

Shivsena | चालते व्हा, शिवसेनेकडून कारवाई सुरुच, शिंदे गटात सामील खासदारांची पदावरून हकालपट्टी

 

Chandrakant Patil | ‘दु:ख झालं, मनावर दगड ठेवून केंद्रीय नेतृत्वाचं ऐकलं’, चंद्रकांत पाटलांचा ‘त्या’ वक्तव्याची पक्षश्रेष्ठींकडून गंभीर दखल