‘इंटिमेट’ फोटो पोस्ट करून गोत्यात आला होता पती ! अभिनेत्री म्हणाली – ‘मी म्हणाले होते फोटो टाकू नकोस’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री सुष्मिता सेनचा भाऊ टीव्ही अ‍ॅक्टर राजीव सेन आणि त्याची पत्नी चारू असोपा यांनी काही दिवसांपूर्वीच अनेक खासगी क्षणांचे इंटिमेट फोटो सोशलवर शेअर केले होते. इंटिमेट फोटो शेअर केल्याबद्दल दोघांनाही खूप ट्रोल केलं गेलं होतं. यानंतर चारूनं या प्रकरणी ट्रोलर्सला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. यानंतर आता चारूनं या सगळ्यावर भाष्य करत प्रतिक्रिया दिली आहे.

अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना चारू म्हणाली, “मी अनेकदा अशा प्रकारच्या ट्रोलिंगकडे लक्ष देत नाही. पण मी राजीवला सांगितलं होतं की, ते फोटो सोशल मीडियावर शेअर करू नकोस. तसं आम्ही काही विचारून एकमेकांना विचारून पोस्ट करत नाही. ज्याला जे आवडतं ते आम्ही करतो. परंतु फोटो शेअर केल्यानंतर समजलं की, आपण ट्रोल झालो आहोत.”

https://www.instagram.com/p/B1gV5odJEmX/?utm_source=ig_embed

चारू पुढे म्हणाली, “ट्रोलिंगनंतर मी राजीवला म्हणाले की, मी नको म्हणूनही तू सोशल मीडियावर फोटो पोस्ट केलेस. यानंतर आमच्यात कडाक्याचं भांडण झालं. नंतर सर्व ठिक झालं. खरं तर अशा गोष्टींवर प्रतिक्रिया देण्यात काही अर्थ नसतो. ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करायला आपण शिकलं पाहिजे.”