चौगुले हॉस्पिटलमध्ये औषध पुरवणाऱ्या ‘एमआर’ला अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन
संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या सांगली येथील चौगुले हॉस्पिटलमधील बेकायदा गर्भपात प्रकरणात पोलिसांनी आज (शनिवार) कराड तालुक्यातील एका एमआरला अटक केली. या एमआरने चौगुले हॉस्पिटलमध्ये औषधे पुरवल्याचा आरोप आहे. सांगली पोलिसांनी त्याला आज पहाटे अटक केली. या गुन्हायीतली मुख्य संशयित डॉ. रूपाली काळेला सहा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’61958cbc-be72-11e8-ba24-d58ca4d741f0′]

सुजित संदीप कुंभार (वय-२९, रा. उत्तर तांबवे, ता. कराड) असे अटक करण्यात आलेल्या एमआरचे नाव आहे. बेकायदा गर्भपात प्रकरणी पोलिसांनी डॉ. रूपाली चौगुलेला १६ सप्टेंबर रोजी रात्री व तिचा पती डॉ. विजयकुमार याला १७ सप्टेंबर रोजी अटक केली आहे. डॉ. चौगुलेला औषध पुरवठा केल्याप्रकरणी शनिवारी पहाटे एमआर सुजित कुंभार याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान त्याने नेमकी कोणती औषधे पुरवली याबाबत पोलिसांनी गोपनियता बाळगली आहे. दरम्यान शनिवारी डॉ. रूपालीची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने तिला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने तिच्या पोलिस कोठडीत सहा दिवसांची वाढ केली आहे. तर कुंभारलाही सहा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याचे पोलिस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी सांगितले.

एच- ४ व्हिसाधारकांचा परवाना रद्द होणार ? 

गर्भपात तसेच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या २० महिलांकडे आत्तापर्यंत चौकशी करण्यात आली असून त्यांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत. त्यातून महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. त्यांच्या जबाबातून मिळालेल्या माहितीनुसार तपासाला गती देण्यात आली आहे. दरम्यान सांगली पोलिसांसह महसूल, आरोग्य विभागाच्या संयुक्त पथकाने गुरुवारी तसेच शुक्रवारी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकले. त्यातील माहितीनुसार तपास सुरू असल्याचेही वीरकर यांनी सांगितले.

[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6d3c083c-be72-11e8-bb53-5f7034716bae’]

 चौगुले हॉस्पिटलमधील बेकायदा गर्भपातप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर दोनच दिवसात प्रमुख संशयितांना अटक करण्यात आली आहे. यातील तिसरा संशयित डॉ. रूपालीचा भाऊ डॉ. स्वप्नील जमदाडे मात्र अद्यापही फरारीच आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके पाठवण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आठच दिवसात औषध पुरवठ्याप्रकरणी एका एमआरला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे कसून चौकशी सुरू असून त्यातून महत्वाचे धागेदोरे मिळाल्याचेही उपअधीक्षक वीरकर यांनी सांगितले.

खडकी येथील सीएसडी कॅन्टीनमधून प्रेशर कुकर चोरणारे अटकेत 
d

बेकायदा गर्भपातप्रकरणी पोलिस, महसूल, आरोग्य विभाग यांच्या संयुक्त पथकाने सलग दोन दिवस सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकले आहेत. दरम्यान शनिवारी या संयुक्त पथकाने कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी परिसरात छापे टाकल्याचे सांगण्यात आले. डॉ. विजयकुमार चौगुले तेथील आरोग्य केंद्रात सेवेत होता. त्याअनुषंगाने चौकाशी करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले.