JioPhone : इथं पहा ‘ऑल-इन-वन’ योजनांची पूर्ण यादी, किंमत 200 रुपयांपेक्षा कमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  जिओ आपल्या प्रीपेड ग्राहकांच्या वेगवेगळ्या गरजांनुसार अनेक प्लॅन सादर करत असते. यात कॉम्बो प्लॅन्स, डेटा व्हाउचर्स, जिओ क्रिकेट प्लॅन्स आणि लॉन्ग टर्म प्लॅन इ. समाविष्ट आहेत. त्याचप्रमाणे जिओ आपल्या जिओफोन युजर्ससाठी अनेक योजना सादर करत आहे. आता आपण जिओफोनसाठी येत असलेल्या ऑल-इन-वन-प्लॅन्सबद्दल जाणून घेऊया.

१८५ रुपयांचा प्लॅन

या योजनेत कंपनी दररोज २ जीबी डेटा, २८ दिवसांची वैधता, मोफत ऑन-नेट कॉलिंग, ऑफ-नेट कॉलिंगसाठी ५०० मिनिटे आणि दररोज १००एसएमएस देत आहे. तसेच यात जिओ अ‍ॅप्सचे फ्री सबस्क्रिप्शनही दिले जात आहे.

१५५ रुपयांचा प्लॅन

कंपनीची ही योजनाही २८ दिवसांच्या वैधतेसह आहे. यात ग्राहकांना दररोज १ जीबी डेटा दिला जातो. तसेच ऑन-नेट मोफत कॉलिंग आणि ऑफ-नेट कॉलिंगसाठी ५०० मिनिटे दिली जातात. याशिवाय यात ग्राहकांना रोज १०० एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सचे फ्री सबस्क्रिप्शनदेखील दिले जात आहे.

१२५ रुपयांचा प्लॅन

या योजनेत कंपनी ग्राहकांना दररोज ०.५ जीबी डेटा देत आहे. म्हणजेच २८ दिवसांच्या वैधतेत ग्राहकांना एकूण १४ जीबी डेटा मिळत आहे. या योजनेत ऑन-नेट फ्री कॉलिंग, ऑफ नेट कॉलिंगसाठी ५०० मिनिटे आणि ३०० एसएमएस देखील मिळत आहेत. तसेच ग्राहकांना या योजनेत जिओ ऍप्सचे फ्री सब्स्क्रिप्शनही दिले जात आहे.

७५ रुपयांचा प्लॅन

कंपनीच्या या जिओफोन योजनेत ग्राहकांना २८ दिवसांच्या वैधतेत दररोज ०.१ जीबी डेटा दिला जातो. अशा प्रकारे या योजनेत ग्राहकांना एकूण ३ जीबी डेटा मिळतो. यात मोफत ऑन-नेट कॉलिंग, ऑफ-नेट कॉलिंगसाठी ५०० मिनिटे आणि ५० एसएमएस देखील मिळत आहेत. इतर योजनांप्रमाणेच ग्राहकांना यात जिओ ऍप्सचे फ्री सब्स्क्रिप्शनही मिळत आहे.