Chhagan Bhujbal On Ajit Pawar | ‘…त्याशिवाय अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत’ – मंत्री छगन भुजबळ

नाशिक: पोलीसनामा ऑनलाइन – Chhagan Bhujbal On Ajit Pawar | राष्ट्रवादीचे बंडखोर नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या राजकीय चर्चेमध्य़े केंद्रस्थानी आहे. अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळण्याचा विक्रम केला असला तरी देखील त्यांच्या मनामध्ये मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. राष्ट्रवादी पक्षाकडून अनेकदा याबद्दल बोलले जाते आणि त्यांच्या नावापुढे भावी मुख्यमंत्री असे लिहित फ्लेक्सबाजी देखील केली जाते. स्वतः अजित पवार यांनी भर सभेमध्ये मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली होती. आता राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री छगन भुजबळ यांनी देखील अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याबद्दल नाशिकमध्ये सूचक वक्तव्य केले. नाशिकमधील शेतकरी संवाद कार्यक्रमावेळी ते बोलत होते. (Chhagan Bhujbal On Ajit Pawar)

मंत्री छगन भुजबळ यांनी निवडणूक आयोगासमोर चालू असलेल्या राष्ट्रवादीच्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. भुजबळ म्हणाले, “एक एक आमदार तीन तीन लाख लोकांचा प्रतिनिधी आहे. म्हणजे 50-55 आमदार असतील तर दीड दोन कोटी लोकांचे प्रतिनिधी येथे आले आहेत. एवढं पाठबळ असलेले आमदार, खासदार अजित पवारांबरोबर असतील, तर न्यायाचा तराजू अजित पवार यांच्या बाजूनेच झुकणार याविषयी माझ्या मनात शंका नाही.” असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी मांडले. (Chhagan Bhujbal On Ajit Pawar)

पुढे भुजबळांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्यावर देखील भाष्य केले. “सगळे म्हणत आहेत की,
अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत. मात्र, ते मुख्यमंत्री कसे होणार. त्यासाठी स्टेजवर असलेल्या सर्व लोकांना काम करावं लागेल. आजचा 45 आमदारांचा आकडा 90 आमदारांपर्यंत नेऊन ठेवला पाहिजे. तेव्हाच अजित पवार मुख्यमंत्री होतील. त्यासाठी सर्वांना झटावं लागेल, काम करावं लागेल. जिथे जिथे निवडणूक होईल तेथे अजित पवारांचे लोक निवडून आले पाहिजेत. ही शक्ती आपण त्यांच्या पाठीमागे उभी करू शकलो नाही, तर केवळ अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे म्हणून ते होणार नाही. त्याची जबाबदारी सर्वांना उचलावी लागेल,” असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

सध्या केंद्रीय निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावावरुन आणि चिन्हावरुन सुनावणी चालू आहे.
अजित पवार गट आणि शऱद पवार गट या दोन्ही गटाकडून जोरदार युक्तीवाद केला जात आहे.
सुनावणीवेळी शरद पवार हे त्यांच्या मनामध्ये येईल तसा पक्ष चालवतात आणि त्यांची निवड देखील लोकशाही
पद्धतीने झालेली नाही असा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Lok Sabha-MNS Vasant More | पुण्यातून वसंत मोरेंना उमेदवारी?, 2024 च्या लोकसभेसाठी मनसेचे 9 उमेदवार ठरले; ‘येथून’ लढणार?