Chhagan Bhujbal On Sharad Pawar | ‘तुम्ही अशाच चुका करा म्हणजे…’, छगन भुजबळांचा येवल्यातून शरद पवारांना टोला

येवला : पोलीसनामा ऑनलाइन – Chhagan Bhujbal On Sharad Pawar | अजित पवारांनी (Ajit Pawar) बंड केल्यानंतर शरद पवार यांनी बंडखोरी करणाऱ्या आमदारांविरोधात दंड थोपटले आहेत. येवल्यात जाहीर सभा घेत त्यांनी पक्ष नव्याने उभा करु असं म्हटलं होतं. तसेच माझी चूक झाली म्हणत छगन भुजबळ यांच्यावर टीका केली होती. आता मंत्रीपद मिळाल्यानंतर छगन भुजबळ पहिल्यांदाच येवल्यात आले आहेत. त्यांचे येवल्यात जोरदार स्वागत करण्यात आले. या स्वागतानंतर बोलताना छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्यावर टीका केली आहे. (Chhagan Bhujbal On Sharad Pawar)

 

 

शरद पवार हे चुकले नाहीत. कोणी म्हणतही नाही ते चुकले असे. परंतु अशा चुका जर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात केल्या तर, महाराष्ट्राचा विकास होईल असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला. मी चार वेळा निवडून आलो पण अशी मिरवणूक निघाली नव्हती. मी जाणार नाही, कोणी मला इथून घालवू शकत नाही, असा इशारा भुजबळ यांनी दिला. पुढच्या आठवड्यात अजित दादांची सुद्धा सभा होईल, असे भुजबळ यांनी म्हटले. (Chhagan Bhujbal On Sharad Pawar)

 

छगन भुजबळ पुढे म्हणाले, घरातील मुलाचा हात धरला असता तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती, असे म्हणत भुजबळ यांनी शरद पवार यांना अजितदादांचा हात धरण्याची गरज होती, त्यांचे हात धरुन काय होणार आहे असं म्हणत त्यांनी शरद पवारांना टोला लगावला. तसेच पक्ष आपला आहे, चिन्ह आपलंच आहे. मतभेद झाले पुढे काय होतं बघू असंही ते म्हणाले. प्रतिभाताई (Pratibha Pawar) यांना लवकरात लवकर बरे वाटो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असे म्हणत भुजबळ यांनी भाषण संपविले.

 

 

Web Title : Chhagan Bhujbal On Sharad Pawar | maharashtra-ncp leader-chagan-bhujbal-criticism-to-sharad-pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime News | गुन्हे शाखेकडून विश्रांतवाडी परिसरात कोकन विकणार्‍या परदेशी नागरिकाला अटक

Tamanna Bhatia | तमन्ना भाटिया व विजयचे अफेअर खरंच प्रेम होतं की फक्त पब्लिसिटी स्टंट? नेटकऱ्यांचा सवाल

New Chandani Chowk flyover | चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामाची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पहाणी