पतीनं चक्क पत्नीचाच तरुणासोबतचा बनवला ‘अश्लील’ व्हिडीओ ! पुढं झालं ‘असं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – छत्तीगडमधील राजनांदगाव येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीनेच आपल्या बायकोचा एका तरुणासोबत अश्लील व्हिडीओ तयार केला आहे. पैसे उकळण्यासाठी त्यांनी हा प्लॅन केल्याचं समजत आहे. नवरा-बायकोनी मिळून पीडित तरुणाकडून 6 लाख रुपये उकळले होते. परंतु पैशाच्या लालसेमुळे ते अडचणीत आले. तरुणाने या प्रकरणी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी नवरा-बायकोला बेड्या ठोकल्या आहेत.

तरुणाला आधी ओढलं प्रेमाच्या जाळ्यात

डोंगरगढ परिसरातील हा प्रकार हनीट्रॅप सारखाच आहे. सदर बायकोने तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. यासाठी महिलेनं तरुणाला लग्नाचं आमिषही दाखवलं. यानंतर तिने त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले. यानंतर त्याचे फोटो आणि व्हिडीओ तयार करण्यात आले. तरुणाला याच्या साहाय्याने ब्लॅकमेल करण्याचा प्लॅन सदर नवरा-बायकोने तयार केला होता. प्लॅननुसार महिलेनं तरुणाशी संबंध ठेवले. पतीनं सर्वकाही रेकॉर्ड केलं.

आरोपी नवरा-बायकाने तरुणाला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली

सर्वकाही कॅमेऱ्यात कैद केल्यानंतर सदर नवरा-बायकोने हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. यानंतर ते पैशांची मागणी करू लागले. आधी तर त्यांनी 10 लाख रुपयांची मागणी केली. पोलिसांच्या तपासात असे समोर आले आहे की, दोघांनी मिळून तरुणाकडे 6 लाख उकळले होते. परंतु त्यांची पैशांची हाव सुटत नव्हती. त्यांनी आणखी पैशांची मागणी केली. अखेर तरुणाने पोलिसात धाव घेत याबाबत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपी नवरा-बायकोला अटक केली.

Visit : policenama.com