सरन्यायाधीश बोबडेंनी ‘या’ कराणामुळे ‘निर्भया केस’च्या सुनावणीतून घेतली ‘माघार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणाला एक आरोपी अक्षय कुमार सिंह याने सुप्रीम कोर्टात फाशीच्या शिक्षेविरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्याच्यावर आज सुनावणी झाली. या आधी या प्रकरणातल्या विनय, पवन आणि मुकेश यांनी अशा प्रकारची याचिका हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. मात्र, कोर्टाने त्या सर्व याचिका फेटाळून लावत शिक्षेवर शिक्कामोर्तब केले होते.

केवळ फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला विलंब व्हावा यासाठीच ही याचिका दाखल करण्यात आल्याचे बोलले जातंय. आज सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने याचिकेवर सुनावणी घेतली. त्यावेळी सरन्यायाधीशांनी या प्रकरणाच्या सनावणीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यासह जस्टिस अशोक भूषण आणि जस्टिस आर. भानुमती हे या खंडपीठात होते.

बुधवारी नवीन खंडपीठ तयार करण्यात येणार असून त्यांच्यापुढे आता नव्याने सुनावणी होणार आहे. या आधी पीडित कुटुंबीयांच्या वतीने ज्या वकिलांनी युक्तिवाद केला होता ते आपले नातेवाईक असल्याने या प्रकरणात मी सुनावणी करणं योग्य नाही, असे बोबडे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर पडली आहे. डिसेंबर 2012 मध्ये निर्भया प्रकरण झाल्यानंतर सर्व आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, आरोपींना शिक्षा होईनही त्याची अंमलबजावणी होत नाही त्यामुळे प्रचंड टीका होत आहे. हैदराबाद प्रकरणानंतर निर्भया प्रकरणातल्या आरोपींना केव्हाही फाशी होऊ शकते असंही बोललं जात होतं त्यामुळेच ही याचिका दाखल करण्यात आल्याचे बोललं जातंय.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/