तक्रार निवारणासाठी प्रत्येक विभागात CMO, उध्दव ठाकरेंची घोषणा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य हिवाळी अधिवेशन नागपूरात सुरु आहे यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सीएमओ बद्दल मोठा निर्णय घेतला. राज्यातील प्रत्येक विभागात लोकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री कार्यालय (CMO) उभारण्यात येणार आहे. नागरिकांना सहकार्य करण्याच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे.

आज अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की राज्यातील प्रत्येक विभागात जनतेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री कार्यालय उभारण्यात येण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यामुळे जनतेला आपल्या समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या विभागात कार्यालय उपलब्ध करुन दिल्याने नागरिकांना मुंबईत मंत्रालयात हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की सीएमओ कार्यालयात प्रत्येक विभागात उभारल्याने लोक आपले प्रश्न तिथेच मांडू शकतील आणि समस्यांचे निराकरण करुन घेऊ शकतात. शेवटी सत्तेचे विकेंद्रीकरण करणे आवश्यक आहे, अन्यथा त्याचा गैरवापर होतो.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/