Children Psychiatric Problems | मुले ऑनलाइन स्क्रीनवर 4 तासापर्यंत घालवत असतील वेळ तर व्हा सतर्क, मोबाइल आणि लॅपटॉपचे व्यसन बनवतेय मानसिक रुग्ण

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Children Psychiatric Problems | जर तुमची मुले ऑनलाइन क्लासशिवाय मोबाइल-लॅपटॉप किंवा कम्प्यूटरचा अतिवापर करत असतील तर ताबडतो सतर्क होण्याची आवश्यकता आहे. तज्ज्ञांनुसार, चार तासापेक्षा जास्त कोणत्याही स्क्रीनवर वेळ घालवणे मुलांना मानसिक आजारांकडे ढकलणारे आहे. (Children Psychiatric Problems)

अनेक मुले तर 6 ते 10 तास ऑनलाइन स्क्रीनवर घालवत आहेत. अशा मुलांना शारीरीक खेळांमध्ये सक्रिय करण्याची आवश्यकता आहे. ऑनलाइन काम करताना काही अंतराने ब्रेक घेणे आवश्यक आहे.

बलरामपुर हॉस्पिटलमध्ये मानसिक रोगतज्ज्ञ डॉ. देवाशीष शुक्ला (Dr. Devashish Shukla) यांनी जागतिक मानसिक आरोग्य दिवसानिमित्त सर्व पालकांना या धोक्याबाबत सावध केले आहे. त्यांनी म्हटले की, कोरोना काळात शिक्षण ऑनलाइन झाल्याने मुलांना मोबाइल आणि लॅपटॉप सहज उपलब्ध होऊ लागेल आहेत.

ओपीडीत पालक सतत अशा तक्रारींसह येत आहे की, त्यांचे मुल मोबाइल लॅपटॉपच्या आहारी गेले आहे. मुलांच्या मानसिक आरोग्यावर याचा विपरित परिणाम होत आहे. मुले चिडचिडी, जिद्दी आणि आक्रमक होत आहेत. डोळेसुद्धा कमजोर होत आहेत. अशी मुले खोलीत एकांतात राहणे पसंत करत आहेत. अशा मुलांचे कौन्सिलिंग (Children Psychiatric Problems) करण्याची आवश्यकता आहे.

सीएमओ डॉ. मनोज अग्रवाल (Dr. Manoj Agarwal) यांनी मानसिक तणावापासून वाचण्यासाठी नेहमी आनंदी राहणे
आणि मित्रांसोबत तणावाच्या गोष्टी शेयर करण्याची सवय लावून घेण्याचा सल्ला दिला आहे.
कार्यक्रमाचे नोडल अधिकारी डॉ. आर. के. चौधरी (Dr. R. K. Caudhari) यांनी म्हटले की,
जर मुलगा आपल्या खोलीत कुणाला येऊ देत नसेल, खोलीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत
असेल तर हीसुद्धा मानसिक रोगाची सुरूवात असू शकते. डॉ. पी. के. श्रीवास्तव (Dr. P. K. Srivastava) यांनी म्हटले की,
तणाव जेव्हा नैराश्यात बदलतो तेव्हा व्यक्तीमध्ये आत्महत्येचे विचार येतात.

Web Title :- Children Psychiatric Problems | addiction of mobile and laptop is making children psychiatric problems be alert if children is spending more than four hours

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cumin Side Effects | लो ब्लड शुगर, किडनी-लिव्हर डॅमेज, अडचणीत आणू शकतात जिर्‍याच्या ‘हे’ 5 साईड इफेक्ट

Maharashtra Rains | राज्यात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता; मान्सूनच्या परतीचा प्रवास

Kids Brain | मुलांच्या मेंदूवर वाईट परिणाम करताहेत केमिकलपासून तयार खेळणी, ‘या’ पध्दतीनं करा बचाव; जाणून घ्या