2-2 आघाडयांवर भारताच्या मोठया विजयामुळं चीन अन् पाकिस्तानमध्ये स्मशान शांताता, जाणून घ्या प्रकरण

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   भारताच्या चक्रव्यूहात चीन असा अडकला आहे कि, एकाच दिवसात चीनच्या अहंकार कोसळला. चीनला केवळ लडाखमधून माघार घ्यावी लागली नाही, तर डब्ल्यूएचओमधील त्याचे पाऊल अपयशी ठरले. डब्ल्यूएचओने पुन्हा एकदा भारतीय औषध हायड्रॉक्सीक्लोरोक्विनला मान्यता देत कोरोना रूग्णांच्या उपचारांमध्ये त्याचा वापर करण्यास परवानगी दिली. या दोन्ही कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे महत्व आणखी वाढले आहे. भारताचे वाढते महत्व पाहता चीनचा जळफळाट तर झालाच आहे, सोबतच चीनचा खास मित्र पाकिस्तानचेही वाईट हाल झाले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आंतरराष्ट्रीय स्तरावर मागे गेले आहेत, तर त्यांच्या जागेवर परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी भारताविरुध्द आग ओकत आहेत. जेव्हा शाह मेहमूद कुरेशी यांना काहीही मिळाले नाही, तेव्हा त्यांनी भारताविरुद्ध जुन्या गोष्टी उकरून काढल्या. ते म्हणाले की, कोरोनाच्या बहाण्याने भारतात मुस्लिमांना लक्ष्य केले जात आहे, हे आंतरराष्ट्रीय समुदायाने ते पाहिले पाहिजे. दरम्यान, शहा महमूद कुरेशी आणि पाकिस्तानला मुद्यावर भारत आणि विश्व समुदायाने कित्येकदा सडेतोड उत्तर दिले आहे .

लडाखमध्येही त्याच शाह महमूद कुरेशी यांनी चीनच्या बाजूने म्हटले होते की, भारत सीमा विस्तारात गुंतला आहे. चीन हे मुळीच सहन करू शकत नाही. त्याला प्रतिकार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. कुरेशी येथेच थांबले नाहीत, त्यांनी असेही म्हटले की, भारत फक्त पाकिस्तान सीमेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करीत नाही तर नेपाळसारख्या देशाच्या सीमेवरही भारताने अतिक्रमण केले आहे. शाह मेहमूद कुरेशी यांना नेपाळच्या संसदेकडून उत्तरही मिळाले असेल. आज जेव्हा चीनला लडाख येथून सैन्य माघार घ्यावे लागले आहे, तेव्हा त्याने आपल्या गोष्टींवर नियंत्रण ठेवले पाहिजे ,पण त्याला भारताची कामगिरी सहन झाली नाही.

दरम्यान, लडाख आणि डब्ल्यूएचओमधील विजयामुळे भारतीय छावणीत आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे, तर दुसरीकडे चीन आणि पाकिस्तानात वातावरण पेटले आहे. दोन्ही देशांचे राज्यकर्ते शोक व्यक्त करत बसले आहे.