Alert : चीन आणि पाकिस्तानची खतरनाक तैयारी, ‘ड्रॅगन’ अन् PAK मिळून ‘जैविक’ हत्याराचं करताहेत परीक्षण

बिजिंग : चीन आणि पाकिस्तानच्या एका भयंकर तयारीचा सुगावा लागला आहे. ते जैविक शस्त्र बनवण्यासाठी 2015 पासूनच भयंकर विषाणूवर परीक्षण करत आहेत. हे घातक कारस्थान चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या आडून घडवले जात आहे. कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीवरून वादात सापडलेल्या चीनच्या वुहान इन्स्टीट्यूट ऑफ वायरोलॉजीला या कामाची जबाबदारी दिली आहे.

क्लाक्सोनच्या रिपोर्टनुसार, वुहान इन्स्टीट्यूटच्या शास्त्रज्ञांची टीम पाकिस्तानसोबत मिळून घातक विषाणूंवर प्रयोग करत आहे. हे परीक्षण पाकिस्तानमध्ये मागील सुमारे पाच वर्षांपासून सुरू आहे. मागच्या वर्षी हे समोर आले होते की, चीन आणि पाकिस्तानने जैविक शस्त्रांची क्षमता वाढवण्यासाठी तीन वर्षांसाठी एक गोपनीय करार केला आहे. वुहान इन्स्टीट्यूट आणि पाकिस्तानी शास्त्रज्ञांकडून करण्यात आलेले पाच अभ्यास सांयटिफिक पेपर्समध्ये प्रकाशित केले आहेत.

प्रत्येक अभ्यासात जूनोटिक विषाणुंची ओळख आणि त्यांच्या लक्षणांबाबत माहिती देण्यात आली आहे. हे विषाणू संसर्गजन्य असतात, जे पशूंकडून माणसांकडे पोहचतात. या अभ्यासांमध्ये वेस्ट नील व्हायरस, मर्स-कोरोना व्हायरस, क्रीमिया-कांगो हेमोरेजिक फिव्हर व्हायरस, थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोम आणि चिकनगुनिया व्हायरसला सुद्धा सहभागी केले आहे. सध्या या विषाणुंच्या मुक्ततेसाठी कोणताही उपचार किंवा वॅक्सीन नाही. यापैकी अनेक व्हायरस खुपच घातक आणि संसर्गजन्य आहेत.

काय आहे सीपीईसी
बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) चीनचा महत्वाकांक्षी प्राजेक्ट आहे. बीआरआय अंतर्गतच सीपीईसी प्रोजेक्टची निर्मिती सुरू आहे. अरबो डॉलरच्या या प्रोजेक्ट अंतर्गत पाकिस्तानच्या ग्वादर बंदराला चीनच्या शिनजियांग क्षेत्राशी जोडायचे आहे.

यांचे घेतले रक्ताचे नमुणे
रिपोर्टनुसार, पाचही अभ्यासांसाठी दर्गम भागात राहणार्‍या आणि पशूंसोबत काम करणार्‍या हजारो पाकिस्तानी पुरूष, महिला आणि मुलांच्या रक्ताचे नमुणे जमवण्यात आले. एका अभ्यासात व्हायरस संक्रमित वेरो सेल्स उपलब्ध करून दिल्याबद्दल वुहानच्या नॅशनल व्हायरस रिसोर्स सेंटरचे आभार मानण्यात आले आहेत. प्रत्येक अभ्यासात सीपीईसीच्या सहकार्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

पाकिस्तानात केले जातेय परीक्षण
क्लाक्सोनने मागच्या महिन्यात विश्वासू सूत्रांच्या संदर्भाने सांगितले होते की, चीन वुहान इन्स्टीट्यूट ऑफ वायरोलॉजीद्वारे पाकिस्तानमध्ये जीवघेण्या बायोलॉजिकल एजंटचे परीक्षण करत आहे. ते याबाबत पाकिस्तानी शास्त्रज्ञांना प्रशिक्षण देत आहेत. या पावलांद्वारे संभाव्य जैविक कार्यक्रम विकसित केला जाऊ शकतो.

कराराचा दुहेरी उद्देश
दोन्ही देशांमध्ये गोपनीय करार करण्यात आला आहे. याअंतर्गत पाकिस्तानी लष्कर आणि चीन संभाव्य संसर्गजन्य आजारांवर संशोधन करत आहे. या कथित कराराचा दुहेरी उद्देश समजला जात आहे. याचा अर्थ हा आहे की, हा शोध लष्करी आणि विना लष्करी वापरासाठी केला जात आहे.