चीननं बनवलं ‘मानव’विरहित हेलिकॉप्टर, जाणकार म्हणाले – ‘भारतीय सीमेवर निगराणी करण्यासाठी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि चीनमध्ये सूरू असलेल्या सीमा वादादरम्यान चीनने आपले पहिले मानवरहित हेलिकॉप्टर बनविले आहे. हे विशेषतः पठारी भागात हेरगिरी करेल. चिनी माध्यमांचा असा दावा आहे की, हे अत्याधुनिक मानवरहित हेलिकॉप्टर भारताच्या सीमेवर तैनात करण्यात येण्याची शक्यता आहे . जेणेकरुन कोणास ठाऊक नसताना चीन आकाशातून सीमांवर नजर ठेवू शकेल. AR500C असे या मानव रहित हेलिकॉप्टरचे नाव असून एव्हिएशन इंडस्ट्री कॉर्पोरेशन ऑफ चायना (एव्हीआयसी) या चीनी सरकार कंपनीने ते तयार केले आहे. कंपनीने पूर्व चीनच्या जिआन्सी प्रांतातील पोयांग येथे याला पहिल्यांदा उडविले. याने अत्यंत योग्य पद्धतीने चांगले काम केले.

चीनच्या एका वेबसाइटच्या मते, हे मानव रहित हेलिकॉप्टर भारताच्या सीमेवरील प्रदेशात पाळत ठेवण्यासाठी, हेरगिरी यासारख्या मोहिमांमध्ये वापरता येईल. एवढेच नव्हे तर त्यात शस्त्रे ठेवल्यास हे हेलिकॉप्टर हल्लादेखील करू शकते. कार्गो डिलिव्हरी करू शकते. शत्रूचे लक्ष्य ओळखण्यास सक्षम आहे. आण्विक आणि रासायनिक गळतींविषयी माहिती देखील देऊ शकते. हे हेलिकॉप्टर जास्तीत जास्त 6700 मीटर उंच म्हणजे 21981 फूट उंचीवर उडू शकते. त्याचा कमाल वेग ताशी 170 किलोमीटर असून त्याचे वजन 500 किलो आहे.

एव्हीआयसीचे तंत्रज्ञान संचालक आणि हेलिकॉप्टर बनविणारे वैज्ञानिक फांग योंगहॉंग यांनी सांगितले की, हे मानव रहित हेलिकॉप्टर पूर्णपणे डिजिटल आहे. हे स्वतः टेकऑफ आणि लँडिंग करू शकते. चीनमधील हे असे पहिले हेलिकॉप्टर आहे जे पठाराच्या भागांवर नजर ठेवण्यासाठी तयार केले गेले आहे. फॅंग योन्गोंग यांनी सांगितले की, आम्ही त्याच्या उड्डाणाची यशस्वी चाचणी घेतली आहे. यात चीनचे अत्याधुनिक आणि शक्तिशाली इंजिन आहे.

चीनचे संरक्षण तज्ज्ञ फू क्विनशाओ म्हणाले की, पठार भागात विमान कमी किंवा हेलिकॉप्टर उडणे फार अवघड आहे. या प्रकरणात, हे मानव रहित हेलिकॉप्टर खूप मदत करेल. फू क्विनशाओ म्हणाले की, चीन आणि भारत यांच्यात सध्या सीमा विवाद सुरू आहे. अशा परिस्थितीत चिनी सरकार या हेलिकॉप्टरच्या मदतीने नियंत्रण रेषाजवळ देखरेख ठेवू शकते. यामुळे लडाखच्या गाळवण खोऱ्यात देखरेख ठेवणे सुलभ होईल.