‘हा’ प्राणी आणि त्याच्या सुपाचे ‘सेवन’ केल्यानं चीन मध्ये फोफावला ‘कोरोना’ व्हायरस, जाणून घ्या

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – ज्याप्रकारे कुत्रा चावल्याने रेबीज होतो त्याचप्रमाणे जंगली प्राण्यांचे मांस खाल्ल्याने कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणावर पसरत चालला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर वटवाघुळाचा समावेश आहे. चीनमध्ये सर्वच प्रकारचे पशु पक्षी आढळून येतात त्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री देखील पहायला मिळते.

वुहान आहे कोरोना व्हयरसचे सर्वात मोठे केंद्र
चीनमधील वूहान या शहरात अशा प्रकारच्या प्राण्यांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होते म्हणून हे शहर कोरोना व्हायरसचे उगमस्थान असल्याचे बोलले जात आहे. कोरोनावर सध्या अनेक डॉक्टर इलाज शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

दुसरे देश देखील चिंतेत
इतर देशांनी देखील या आजाराचे महत्व लक्षात घेऊन अलर्ट जारी केला आहे. भारताने देखील आपल्या चीनमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. एव्हडेच नाही तर भारताने आपल्या चीनमधील विद्यार्थ्यांना आणि इतर नागरिकांना फ्रब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एअरलिफ्ट करण्याची तयारी देखील सुरु केली आहे.

व्हिडीओ केला गेला जारी
एका व्हिडिओमध्ये मुलगी वटवाघुळाचे सूप पित आहे. यामुळे हा प्राणी सूप पिण्यासाठी आणि खाण्यासाठी वापरला जातो हे निश्चित झाले आहे. वटवाघूळ हे काळ्या रंगांचे असते. व्हिडिओमध्ये मुलगी ते खाताना आणि ज्यूस पिताना स्पष्टपणे दिसत आहे.

वुहानमध्ये आहे मोठे मार्केट
वुहान हे शहर वटवाघुळांचे मोठे मार्केट आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी वटवाघूळांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणावर चालते. सुरुवातील कोरोना सापांमध्ये आढळून आला त्यानंतर तो वटवाघुळांमध्ये पोहचला. या ठिकाणी अनेक लोक वटवाघुळांचे सूप पितात तर काही हौशी लोक खाण्यासाठी देखील वटवाघुळांचा वापर करतात. सापांमधून हा आजार वटवाघुळात आला आणि त्यानंतर माणसात असा अनुमान येथील डॉक्टर आणि शास्त्रज्ञांनी लावला आहे.

इतर देशांमध्ये देखील पसरला कोरोना व्हायरस
चीन शिवाय हा व्हायरस इतर देशांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर आढळून आला आहे. अमेरिका, जापान, दक्षिण कोरिया आणि थायलंड या ठिकाणी कोरोना चांगल्या प्रमाणात पसरलेला आहे. ब्रिटन आणि मेक्सिकोमध्ये देखील शेकडो संशयित आढळून आले आहे आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –