मंगळाच्या कक्षेत पोहचण्यासाठी चीनची तडफड सुरूच, भारतानं 6 वर्षापुर्वीच केलं होतं हे मिशन पुर्ण

बिजिंग : कोरोना महामारीदरम्यान चीनने लवकरच मंगळ ग्रहावर ’तियानवेन-1’ पाठवण्याची योजना तयार केली आहे. हे चीनच्या आगामी तीन प्रमुख महत्वकांक्षी मिशनपैकी एक मिशन आहे. भारत सहा वर्षापूर्वीच मंगळ ग्रहाच्या कक्षेत पोहचणारा पहिला आशियाई देश बनला होता. जर युरोपीय संघ सोडला तर दोन देश अगोदरच मंगळ ग्रहाच्या कक्षेत पोहचण्यात यशस्वी झाले आहेत. 2014 मध्ये भारत सुद्धा मंगळाच्या कक्षेत पोहचण्यात यशस्वी झाला होता. जर चीनचे हे मिशन यशस्वी झाले तर तो मंगळाच्या कक्षेत पोहचणारा चौथा देश असेल.

तियानवेन -1 चीनचे पहिले मंगळ मिशन
तियानवेन -1 चीनचे पहिले मंगळ मिशन आहे. लाँग मार्च – 5 वाहक रॉकेट चीनचे सर्वात अवजड प्रक्षेपण यान आहे. याचा उद्देश शास्त्रज्ञांसाठी मंगळ ग्रहाची माहिती एकत्र करणे आहे. चीनी राष्ट्रीय अंतराळ प्रशासनाने (सीएनएसए) मंगळ मिशनचे नाव तियानवेन ठेवले आहे, ज्याचा अर्थ स्वर्गीय प्रश्न किंवा स्वर्गाला प्रश्न. तियानवेनचे नाव चीनचे सुप्रसिद्ध कवि कु युआन यांच्या एका कवितेवर अधारित आहे.

भारत पहिला आशियाई देश
भारत, अमेरिका, रशिया आणि युरोपीय संघाप्रमाणे चीन सुद्धा यावर्षीच्या मिशनद्वारे मंगळावर पोहचण्याचा प्रयत्न करणार आहे. 2014 मध्ये भारत मंगळ ग्रहाच्या कक्षेत पोहचणारा पहिला आशियाई देश बनला होता. सोबतच आपल्या प्रयत्नात असे करणारा भारतच होता. 450 कोटी (73 मिलियन अमेरिकन डॉलर) चा खर्च करून मंगळ मिशन सुरू करणारा भारत जगातील एकमेव देश आहे, जो सर्वात कमी खर्च आहे.

2018 मध्ये नासाने रचला इतिहास
दोन वर्षांपूर्वी नोव्हेंबर 2018 मध्ये अमेरिकन अंतराळ एजन्सी नासाने इतिहास रचला होता. नासाचे ’मार्स इनसाइट लँडर’ यान मंगळ ग्रहावर यशस्वीपणे पोहचले होते. अमेरिकन अंतराळ एजन्सी नासाचे इनसाइट मंगळाच्या जमीनीवर उतरवण्यात आले होते. त्याने मंगळाचा पहिला फोटो पाठवला होता.

तेव्हा असे मानले जात होते की, यातून आपल्याला पृथ्वीच्याबाबतीत आणखी माहिती मिळू शकते. नासाचे मार्स इनसाइट यान सुमारे 7 वर्षांचा प्रवास केल्यानंतर लँड झाले होते. हे नासाच्या इतिहासातील मंगळावरील आठवे यशस्वी लँडिंग होते. इनसाइटने मंगळ ग्रहाच्या बाहेरील वातावरणातून 19,800 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवेश केला होता, आणि मंगळाच्या जमीनीवर उतरण्यापूर्वी आठ किलोमीटर प्रतितासाचा वेग कमी झाला.