भारतीय सैनिकांसाठी चीनचा भांगडा…वाजवतायत पंजाबी गाणी

पोलिसनामा ऑनलाईन – भारत चीन सीमेवर तणावाचे वातावरण असताना चीनकडून सातत्याने कुरापती मात्र सुरूच आहेत. आता चीनने नवी खेळी खेळत फिंगर 4 या ठिकाणी लाऊडस्पीकर लावले आहेत. लाऊडस्पीकरवर पंजाबी गाणी वाजवण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. लाऊडस्पीकरद्वारे भारतीय जवानांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे.

फिंगर चार परिसरात चीनच्या लष्काराने लाऊडस्पीकर लावले आहेत. ज्याठिकाणी चिनी सैनिकांनी लाऊडस्पीकरल लावले आहेत तो परिसर भारतीय जवानांच्या देखरेखीखाली आहे. भारतीय जवानांचे लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जात आहे. जवानांवर मानसिकरित्या दबाव आणण्यासाठी चीनकडून या कुरापती सुरू असल्याचंही सांगण्यात आले आहे. काही दिवसांपुर्वी दोन्ही बाजूंच्या जवानांनी 100 ते 200 राऊंड फायरिंग केली होती. मागील 20 दिवसांमध्ये भारत आणि चीनदरम्यान पूर्व लडाखमध्ये 3 वेळा गोळीबारीच्या घटना घडल्या आहेत.