Coronavirus : चीनमध्ये ‘कोरोना’ चे 53 नवे रूग्ण सापडल्यानंतर ‘झिनफडी’ बाजार बंद करण्याची घोषणा

बिजिंग : चीनमध्ये 53 नवे कोरोनाचे रूग्ण सापडल्यानंतर सरकारने रविवारी झिनफडी बाजार बंद करण्याची घोषणा केली आहे. हे मार्केट फळे आणि भाजीसाठी प्रसिद्ध आहे. द न्यूयॉर्क टाइम्सने बिजिंग आरोग्य आयोगाचा संदर्भ देऊन म्हटले आहे की, कोविड-19 चे नवीन रूग्ण सापडल्याने सरकारला नाईलाजाने अनिश्चित काळासाठी बाजार बंद करावा लागला. चीनच्या वुहानमध्येच कोरेाना व्हायरस उत्पन्न झाला आणि जगभरात पसरला आहे. जगभरात 200 पेक्षा जास्त देश कोरोनाच्या संकटाला तोंड देत आहेत.

चीनमध्ये स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी खुप मेहनत करावी लागली आहे. येथे सुद्धा कोरोनाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. यामध्ये चीनला यश देखील मिळाले. मात्र, एक महिन्याचा कालावधी उलटल्यानंतर पुन्हा चीनमध्ये कोरोनाचे रूग्ण सापडू  लागले आहेत. संपूर्ण चीनमध्ये रविवारी 57 नवे रूग्ण सापडल्याची नोंद झाली आहे. कोरोना संसर्गाचा पहिला रूग्ण चीनमध्ये सापडला होता. यानंतर रूग्णांची संख्या वाढत गेली. या व्हायरसमुळे चीनमध्ये आतापर्यंत 84,229 लोकांना संसर्ग झाला आहे, तर 4,638 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.