चीन सप्टेंबरपासून सुरू करणार एलियन्सचा शोध, ‘या’ मोठ्या टेलिस्कोपची घेणार मदत

बिजिंग : वृत्तसंस्था – चीन सतत आपल्या कृत्यांनी जगाला हैरान करून सोडत आहे. आता चीन एलियन्सचा शोध घेण्यास सुरूवात करणार आहे. यासाठी तो आपल्या सर्वात मोठ्या टेलिस्कोपची मदत घेणार आहे. यासाठी एक्स्ट्राटेरेस्ट्रियल इन्टेलिजन्स (एसईटीआय) च्या शास्त्रज्ञांनी तयारी सुरू केली आहे.

एसईटीआयच्या शास्त्रज्ञांनी अंतराळात एलियन्सचा शोध घेण्यासाठी फाइव्ह हन्ड्रेड मीटर अपर्चर स्फेरिकल टेलिस्कोप (एफएएसटी) चा वापर करण्याची योजना तयार केली आहे. अधिकृत माहितीनुसार यावर्षी सप्टेंबर महिन्यापासून चीनचे शास्त्रज्ञ एलियन्सचा शोध घेण्यास सुरूवात करणार आहेत.

एफएएसटी टेलिस्कोपच्या निर्मितीला 2011 मध्ये सुरू झाली होती. जी 2016 मध्ये तयार झाली. या टेलिस्कोपने या वर्षी जानेवारीमध्ये काम करण्यास सुरूवात केली आहे. एसईटीआयच्या शास्त्रज्ञांनी मार्चमध्ये एक रिपोर्ट प्रकाशित केला होता, ज्यामध्ये ते या एफएएसटी टेलिस्कोपचा कशा प्रकारे वापर करणार आहेत, हे सांगितले होते.

शास्त्रज्ञांनी सर्वप्रथम हे काम केले की, रेडियो फ्रिक्वेन्सीमुळे येणार्‍या अडथळ्यांना कसे दूर करावे, जेणेकरून अंतराळातून पृथ्वीवर येणारे एलियन्सचे सिग्नल शोधणे सोपे होऊ शकते.

चीनच्या शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, ते या टेलिस्कोपद्वारे एलियन्स सोबत संपर्क प्रस्थापित करू शकतील. ते पृथ्वीकडे येणार्‍या सर्व तरंगांना फिल्टर करून दूर अंतराळातून येणार्‍या सिग्नलना ओळखण्याचा प्रयत्क करत आहेत.

चीनच्या एसईटीआय प्रोजेक्टचे सीनियर सायंटिस्ट झांग तोंगजी यांनी सांगितले की, आमचे एलियन्सला शोधण्याचे मिशन सप्टेंबर 2020मध्ये सुरू होणार आहे. या प्रोजेक्टमुळे जगातील इतर प्रोजेक्टला कोणत्याही अडचणी येणार नाहीत. एलियन्स शोध घेण्याच्या दरम्यान एफएएसटी टेलिस्कोपची अन्य कामे थांबणार नाहीत. चीनचे अन्य अंतराळ मिशन सुरूच रहातील. आम्ही केवळ त्या तरंगांना पकडण्याचा प्रयत्न करणार आहोत, जे दूर अंतराळातून येतात.