चीनला ‘खूश’ करण्यासाठी पाकिस्तान आपल्या जनतेलाच देतेय अशी वागणूक !

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पाकिस्तानमध्ये चिनी गुंतवणूकीबाबत आधीच चिंता व्यक्त केली जात होती. पाकिस्तान सरकार दावा करीत आहे कि, चीनच्या गुंतवणूकीमुळे स्थानिक लोकांसाठी नोकर्‍या निर्माण होतील आणि त्यांना त्याचा फायदा होईल. मात्र, आतापासूनच या दाव्याचे वास्तव दिसू लागले आहे. पाकिस्तानच्या एका वृत्तानुसार, पाकिस्तानमधील चीनच्या मदतीने सुरु झालेल्या मेट्रोमध्ये चिनी कर्मचाऱ्यांना स्थानिक लोकांच्या तुलनेत जास्त पगार दिला जात आहे. आपल्याच देशात होणाऱ्या भेदभावामुळे पाकिस्तानी कर्मचार्‍यांचे मनोबल कमी होत आहे. तर चिनी कर्मचा्यांना युआनमध्ये पगार दिला जात आहे, तर स्थानिक लोकांना फक्त पाकिस्तानी रुपयातच पगार देण्यात येत आहे.

माहितीनुसार, बुधवारी एका चिनी युआनची किंमत 24 पाकिस्तानी रुपयांच्या समतुल्य होती. ऑरेंज लाइन मेट्रो ट्रेन प्रकल्पाशी संबंधित 93 चिनी कर्मचार्‍यांच्या पगाराच्या आकडेवारीचा अभ्यास केल्यानंतर असे दिसून आले आहे की त्यांना बराच पगार देण्यात येत आहेत. जर आपण त्याच पदावर कार्यरत असलेल्या पाकिस्तानी कर्मचारी आणि चिनी कर्मचार्‍यांची तुलना केली तर पाकिस्तानी लोकांना काहीच मिळत नाही. एका आकडेवारीनुसार, दरमहा 136,000 युआन चीनी मूळचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी / सीएफओ / संचालक (ग्रेड 2) यांना दिले जात आहेत, जे सुमारे 32 लाख पाकिस्तानी रुपये आहेत. या ग्रेडमध्ये तीन पदे होती आणि केवळ तीन चिनी नागरिकांची नेमणूक करण्यात आली होती. या पदावर कोणत्याही पाकिस्तानची नेमणूक केलेली नाही.

डीजीएम रँकच्या चिनी अधिकाऱ्यांंना दरमहा 83,000 युआन दिले जात आहेत, जे 19 लाखांच्या बरोबरीचे आहेत. उमर चिश्ती या पाकिस्तानी अधिकाऱ्यास डीजीएम उपकरण व देखभाल दुरुस्तीसाठी पोस्ट केले जाते, तर त्यांना फक्त 6,25,000 रुपये मिळतात. अहवालानुसार मेट्रोमध्ये तंत्रज्ञ / ट्रेन ऑपरेटर आणि इतर पदांवर तैनात असलेल्या 43 चीनी लोकांना मूळ 47,500 युआन म्हणजे 11 लाख रुपये मानधन दिले जात आहे. मात्र, पाकिस्तानी ट्रेन ऑपरेटर किंवा ट्रेनच्या क्रूला केवळ 60,000 रुपये मिळतात.

पगाराच्या या भेदभावाचे आणखी एक उदाहरण देताना या वृत्तानुसार, चिनी वंशाचे 12 लोक रेल्वे डिस्पॅचर आणि रेल्वे चालक दल यांच्या पदावर काम करत आहेत, ज्यांना दरमहा 57,000 युआन (13 लाख) वेतन दिले जात आहे. , या पदांवर तैनात पाकिस्तानी लोकांना फारच कमी पगार मिळत आहेत.

आपल्या चिनी सहकाऱ्याचा पगार पाहता पाकिस्तानी कर्मचार्‍यांनीही सरकारकडून पगार वाढवण्याची मागणी केली आहे. त्याच वेळी पंजाब मास ट्रान्झिट अथॉरिटीचे सरव्यवस्थापक उज्जार शहा म्हणाले की, जर पाकिस्तानी कर्मचारी पाकिस्तानी लोकांशी तुलना करतात तर त्यांचे मनोबल कमी होणार नाही. ते म्हणाले की, पाकिस्तानी कर्मचारी आणि चिनी कर्मचार्‍यांच्या पगाराची अजिबात तुलना करता येणार नाही.