‘या’ चायनीज स्मार्टफोनमध्ये लावला होता X-ray कॅमेरा ! दिसत होतं कपड्यांच्या ‘आरपार’

वनप्लस स्मार्टफोनचे एक असे सीक्रेट फिचर समोर आले आहे, ज्याबाबत समजले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. वनप्लस 8 प्रो स्मार्टफोनमध्ये खास प्रकारची इन्फ्रारेड फोटोक्रोम लेन्स देण्यात आली होती, जी प्लास्टिक आणि कपड्यांच्या आरपार पाहण्यासाठी सक्षम होती. जेव्हा इंटरनेटवर काही व्हिडिओ शेयर केले गेले, ज्यामध्ये दाखवण्यात आले होते की, वनप्लस 8 प्रो च्या कॅमेर्‍याने एक्स-रे प्रमाणे आरपार दिसू शकते. मात्र, या छुप्या फिचरबाबत समजताच कंपनीने हे सेन्सर डिसेबल केले.

अशाप्रकारे झाला या गोष्टीचा खुलासा

काही दिवसांपूर्वी एक ट्विटर यूजर, बेन जेस्किनने आपल्या ट्विटर हँडलद्वारे काही शॉर्ट व्हिडिओ पोस्ट केले होते. यामध्ये वनप्लस 8 प्रो चे एक्स-रे फीचर दाखवण्याचा प्रयत्न केला होता. हे फिचर फोनमध्ये एका फोटोक्राम फिल्टरद्वारे काम करते, ज्याची माहिती वनप्लस 8 प्रोचा वापर करताना बेन यास मिळाली होती. या ट्विटमध्ये तुम्ही स्पष्ट पाहू शकता की कशाप्रकारे वनप्लस 8 प्रो चा कॅमेरा काही डार्क ऑब्जेक्टला पूर्णपणे ट्रान्सपरंट (आरपार पाहण्या लायक) बनवतो.

वनप्लसला फिचर करावे लागले डिसेबल

या फिचरची बाब समोर येताच वनप्लसने अपडेट देऊन ते डिसेबल केले. आता ते काम करत नाही. वनप्लसने या नव्या अपडेटला बुधवारी ऑफिशल ब्लॉग पोस्टद्वारे अनाऊंस केले होते.