Chitra Wagh | औरंगाबादच्या नामांतरणाच्या मुद्यावरून चित्रा वाघ यांच्या ‘त्या’ वक्तव्याने पुन्हा एकदा नामांतरणाचा वाद पेटण्याची चिन्हे

संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाईन – औरंगाबादच्या नामांतरणाचा मुद्दा चर्चेत असताना भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा नामांतरणाचा मुद्दा पेटण्याची चिन्हे आहेत. त्यांनी संभाजीनगर येथे आयोजीत भाजपच्या सभेत बोलताना नुसत्या संभाजीनगर ऐवजी धर्मवीर छत्रपती संभाजीनगर असं नाव करण्याची मागणी केली आहे. यावरून राजकीय वातावरण परत एकदा नामांतरणाच्या मुद्यावर तापण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (Chitra Wagh)

 

राज्याच्या हिवाळी अधिवेशनात बोलताना विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असे वक्तव्य केले होते. त्यांच्या याच वक्तव्यावरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर नव्हे तर धर्मवीर छत्रपती संभाजीनगर करा अशी मागणी केली आहे. तर याबाबत आपण लवकरच शिंदे-फडणवीस सरकारकडे मागणी करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

 

जाणून घेऊया नक्की काय म्हणाल्या चित्रा वाघ?
औरंगाबाद येथील भाजपच्या सभेत बोलताना चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या की, कुठलाही विषय नसताना देखील छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान केला गेला. अजित पवार म्हणतात की, छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हतेच. या राज्यातील मुलामुलाला माहित आहे की, धर्माचे रक्षण करण्यासाठी राजेंनी काय केले आहे. यासाठी त्यांनी आपला जीव दिला आणि प्राण पणाला लावले. त्यामुळे राज्यभरात भाजपच्या वतीने अजित पवारांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे. तर मी शिंदे-फडणवीस सरकारकडे औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर न ठेवता धर्मवीर छत्रपती संभाजीनगर ठेवण्याची मागणी केली असल्याची माहिती यावेळी बोलताना चित्रा वाघ यांनी दिली.

याबाबत पुढे बोलताना चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या, औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे.
दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यापूर्वी घेतलेल्या शेवटच्या
मंत्रीमंडळ बैठकीत औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.
त्यानंतर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने देखील पुन्हा औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला.
याचा अंतिम प्रस्ताव देखील त्यांनी केंद्राकडे पाठवला आहे.
अशातच आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी पुन्हा एकदा एक नवीन नाव औरंगाबाद शहरास सुचवल्याने या मुद्यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

Web Title :- Chitra Wagh | change the name of aurangabad to dharmaveer chhatrapati sambhajinagar not chhatrapati sambhajinagar chitra wagh demand

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Supriya Sule | सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांची पाठराखण, म्हणाल्या-‘दादा नेमकं काय म्हणाले हे शांतपणे ऐकून घेतलं तर…’

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार! व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून रिमूव्ह केल्याने ग्रुप अ‍ॅडमिनची जीभ कापली

Maharashtra Politics | भाजप-शिंदे गटात राऊत भांडण लावत आहेत; शिंदे गटातील मंत्र्याचा राऊतांवर आरोप