Chitra Wagh | ‘मगरमच्छ के आंसू’ गाळण्याची गरज नाही’, चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळेंवर टीका; ‘मोठ्या ताई’ उल्लेख करत केलं ट्विट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतील मरीन लाईन्स येथील महिलांच्या वसतीगृहात एका तरुणीची हत्या झाली, तर आज मीरा रोड परिसरात (Mira Road Murder Case) लिव्ह इनमध्ये (Live in Relationship) राहणाऱ्या महिलेची हत्या झाल्याचे समोर आले आहे. यावरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला. यावर आता भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मोठ्या ताई’ असा उल्लेख करत चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
मीरा-भाईंदरमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या 56 वर्षीय प्रियकराने 32 वर्षीय प्रेयसीची हत्या करुन तिचे कटरने लहान लहान तुकडे करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला. यावरुन सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. गुन्हेगारांना (Criminals) या राज्यात कायद्याचा धाक शिल्लक राहिलाच नाही अशी ही स्थिती आहे. महिलांवरील गुन्हे संतापजनक पद्धतीने वाढत आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांनी आपल्या खात्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे असा सल्ला दिला. तसेच या प्रकरणातील आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टात (Fast Track Court) खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी तपासयंत्रणांनी प्रयत्न करावे, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली.
सुप्रिया सुळेंच्या ट्विटला चित्र वाघ यांचं ट्विट करुन प्रत्युत्तर
सुप्रिया सुळे यांच्या ट्विटनंतर चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सुप्रिया सुळे यांना टॅग करुन टीका करणारं ट्विट केलं आहे. सुप्रिया ताई, तुमची रंग बदलण्याची कला पाहून सरड्याला पण लाज वाटली असेल… किती सोयीस्करपणे तुमच्या संवेदना जाग्या होताहेत हो? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.
तुमच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मंचरच्या मुलीसाठी तुमच्या संवेदना जाग्या झाल्या नाहीत.. मुलीला मुस्लिम तरुणाने पळवून नेलं. ती अडीच वर्ष सापडली नाही. तेंव्हा तुमचंच लाडकं सरकार होतं. श्रद्धा वालकर प्रकरणात (Shraddha Walker Case) तुम्ही वेळीच लक्ष दिलं असतं तर तिचेही 35 तुकडे झाले नसते. वसुलीत मग्न असलेल्या तुमच्या गृहमंत्र्यांना श्रद्धा वालकरच्या आई वडिलांची हाक ऐकू आली नाही, हे ही दुर्दैवच!, असंही ट्विटमध्ये म्हटले आहे.
मीरा रोड प्रकरणात नक्कीच कारवाई होईल. दोषींची गय केली जाणार नाही कारण इथे गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीस
या सक्षम नेत्याकडे आहे. त्यासाठी तुम्हाला ‘मगरमच्छ के आंसू’ गाळण्याची गरज नाही, मोठ्या ताई…, असं
ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.
Web Title : Chitra Wagh | meera bhayandar murder case woman body chopped off chitra wagh targets supriya sule
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Sara Ali Khan | अखेर क्रिकेटर सोबत लग्न करणार का नाही यावर साराने दिलं उत्तर…!