Chitra Wagh On Uddhav Thackeray | चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला, ”आमचं सरकार कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही; अगदी तुम्हालाही नाही”

मुंबई : Chitra Wagh On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांनी इतर राज्यात भाजपाच्या (BJP) प्रचारासाठी गेलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि राज्य सरकारवर (State Govt) आज जळजळीत टीका केल्यानंतर अपेक्षप्रमाणे भाजपा आणि शिंदे गटात (Shinde Group) त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. ठाकरे यांनी केलेल्या टिकेला भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh On Uddhav Thackeray) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धवजी… आमचं सरकार कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही; अगदी तुम्हालाही नाही, असा खोचक टोला वाघ यांनी लगावला आहे.

चित्रा वाघ यांनी एक्स अकाउंटवर एक पोस्ट केली असून यात म्हटले आहे की, उद्धवजी…आमचं सरकार कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही; अगदी तुम्हालाही नाही. आमचं सरकारच रयतेचं कल्याण आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहे त्यामुळेच ट्रिपल इंजिन सरकार असूनही आमची गाडी व्यवस्थित चाललीय आणि तुम्ही मात्र डबल इंजिनाची गाडी गाळात घातली.

चित्रा वाघ यांनी पुढे म्हटले आहे की, आम्ही राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. म्हणून सुरूवातीला ४० तालुक्यांपुरती असलेली दुष्काळाची व्याप्ती तातडीने कार्यवाही करत आणखी काही तालुक्यांतील १०२१ महसुली मंडळांपर्यंत वाढवली…आताही अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणे युद्धपातळीवर सुरू आहे. सरकार पूर्ण ताकदीनिशी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कटिबद्ध आहे… तुम्ही सत्ता गमावल्याच्या दु:खाचं उट्टे काढण्यासाठी शेतकऱ्यांचा खांदा वापरू नका… (Chitra Wagh On Uddhav Thackeray)

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे…
उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल करताना म्हटले होते की, दुसऱ्याच्या राज्यात जाण्यापेक्षा मुख्यमंत्री
स्वतःचं घर, स्वतःचं राज्य का नाही सांभाळत? भाजपा इतर राज्यात ज्या थापा मारतंय, त्या आता आवरा!
आम्ही महाराष्ट्रात निवडणुकांची वाट बघतोय! तुमच्या ट्रिपल इंजिनमधून थापांचे धूर न सोडता बळीराजाला भरघोस
मदत करा. राज्य वाऱ्यावर पडलंय. एक फुल दोन हाफ. दुसरे दोन हाफ कुठेत, कल्पना नाही. मुख्यमंत्री, पंतप्रधानांना
इतर राज्यात प्रचार करायला, रेवडी उडवायला वेळ आहे. मग माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या पाठीवर हात
फिरवायला तुम्ही कधी येणार? असा सवाल ठाकरे यांनी केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा, ”मराठी आणि हिंदुत्त्वाबद्दल फक्त तोंड वाजवायचं, नुसतं बाळासाहेबांचे विचार…”

CM Eknath Shinde | CM शिंदेंकडून भुजबळांच्या मागणीचे समर्थन, म्हणाले – ”तीच भूमिका सरकारचीही आहे…”

Sudamrao Landge Passed Away | पिंपरी-चिंचवडचे माजी उपमहापौर सुदामराव लांडगे यांचे निधन

Pune Pimpri Crime News | हटकले म्हणून तरुणावर दारूच्या बाटलीने जीवघेणा हल्ला, आकुर्डी येथील घटना