Chitra Wagh | ‘त्या’ तरुणीला रघुनाथ कुचीकनेच गायब केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा आरोप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना कामगार नेते (Shiv Sena Labor leader) रघुनाथ बबनराव कुचिक (Raghunath Babanrao Kuchik) याच्याविरोधात 24 वर्षीय तरुणीने बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल केला होता. कुचीकने शारीरिक संबंध (Physical Relationship) प्रस्थापित केल्यानंतर ती गरोदर (Pregnant) राहिली. त्यानंतर जबरदस्तीने तिचा गर्भपात (Abortion) करुन त्या तरुणीला जीवे मारण्याची धमकी (Threat) दिल्याची तक्रार तरुणीने केली होती. यानंतर तरुणी गायब (Missing) झाली आहे. त्यावर भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी रघुनाथ कुचीकवर आरोप केला आहे. या पीडित तरुणीला रघुनाथ कुचीकनेच गायब केल्याचा आरोप चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केला आहे.

पुण्यात (Pune) ज्या तरुणीने शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा (FIR) दाखल केला होता. ती तरुणी मागील दोन दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. शनिवारी या पीडितेने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पुणे पोलिसांच्या प्रसंगावधानाने त्या मुलीला वाचवण्यात यश आलं. मात्र आता ती मुलगी कुठेच सापडत नसून या मुलीला कुचीकनेच गायब केल्याचे चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सांगितले.

 

चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकार (Government of Maharashtra) आणि पुणे पोलीस (Pune Police) यांना घरण्याचा प्रयत्न केला आहे.
बेपत्ता झालेल्या तरुणीचा कोणताच संपर्क होत नाही. तीच आजचं लोकेशन पणजी (Panaji) दाखवत आहे,
पोलीस देखील तपास करत आहेत, असे सांगत चित्रा वाघ यांनी ती मुलगी जिथं कुठे आहे ती सुखरुप असावी अशी प्रार्थना केली.

रुपाली चाकणकर यांच्यावर टीका

जी मुलगी बेपत्ता झाली आहे ती आमच्या संपर्कात आहे अशी माहिती महिला आयोगाच्या (Women’s Commission) अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी आज सकाळी दिली.
या विधानावर चित्रा वाघ यांनी टीका केली.
ती मुलगी बेपत्ता असताना देखील जबाबदार पदावर बसलेल्या व्यक्तीने असं बेजबाबदार विधान करुन आपलं
अडाणी पण दाखवू नये अशी खोचक टीका चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर केली.

Web Title : Chitra Wagh | that lyoung girl was disappeared by shivsena
leader raghunath kuchik bjp leader chitra waghs allegation

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा