हवेली तालुक्यातील नागरिकांना ‘रेशन’वरील धान्याची प्रतीक्षा

वाघोली : पोलीसनामा ऑनलाइन – हवेली तालुक्यातील अनेक केशरी कार्ड धारकांना मागील तीन महिन्यापासून अन्यधान्य मिळतच नसल्याची परिस्थिती आहे. पुणे जिल्ह्यात काही रेशन दुकानदारांनी पैसे जमा करून देखील पुरवठा विभागाकडून धान्य मिळाले नसल्याचे रेशन दुकानदार याच्या कडून सांगण्यात येत आहे. तर अन्न सुरक्षा योजनेतील समाविष्ट न झालेल्या व ऑनलाईन नोंदणी न झालेल्या शिधापत्रिका धारकांना कोरोनाच्या अनुषंगाने राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारकडून अल्प दरात म्हणजे प्रति माणशी ८ रुपयेप्रमाणे तीन ३ गहू तर १२ रुपयेप्रमाणे २ किलो तांदूळ केशरी व पिवळे कार्ड धारकांना अन्नधान्य पुरवण्यात येईल असे सांगण्यात आले होते.

मात्र मागील तीन महिन्यांपासून हे अन्नधान्य गरीब, कष्टकरी, होतकरू शिधा पत्रिकाधारकांना मिळालेच नाही मग हे अन्नधान्य गेले कुठे असा सवाल कार्डधारक करत आहेत. या कार्ड धारकांना स्वस्त दरातील मिळणारे गहू, तांदूळ, तेल, डाळ अन्न धान्यच्या विषयी माहिती घेतली असता आत्तापर्यंत हवेलीच्या पुरवठा विभागाकडे सरकारकडून देण्यात येणारे अन्नधान्याचा साठा उपलब्ध झाला नसल्याने हे अन्नधान्य आपण देऊ शकलो नाही अशी माहिती पुणे जिल्हा पुरवठा अन्नधान्य वितरण विभागाच्या वतीने देण्यात आली. जेव्हापासून लाॕकडाऊन झाले होते तेव्हापासून दर महिन्याला अल्प दरातील तांदूळ व गहू अन्न सुरक्षा योजनेतील नागरिकांना मिळत आहे. पण केशरी कार्डधारक व पिवळे कार्ड धारक यांना मिळतच नसल्याने ते कार्डधारक वेळोवेळी राशन दुकानदार यांना अन्नधान्याची मागणी करीत आहेत असल्याने कार्ड धारकांना मध्ये व रेशन दुकांदारांमध्ये या वरून वाद ही निर्माण होत आहेत.

केंद्र शासनाच्या आदेशानुसार गरिबांना मोफत व अल्प दरात अन्नधान्य पुरवण्यासाठी ही योजना अमलात आणली होती,मात्र आता सध्या पुणे जिल्ह्यात या योजनेचे तीनतेरा वाजले असून याकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुरवठा मंत्री छगन भुजबळ व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी लक्ष देण्याची गरज आहे. कोरणा रोगाच्या अनुषंगाने हाताला काम नाही आणि आणि अल्प दरातील रेशन मिळत नाही यामुळे केशरी व पिवळे कार्डधारकांची मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. कार्ड धारक रेशन दुकानदारांना वेळोवेळी फोन करून व समोर जाऊन वेठीस धरत असल्याचे प्रकार घडत आहेत तरी पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील रेशन गरिबांना वाटप करण्याची मागणी सर्वसामान्य कार्डधारक करत आहेत.

सरकारच्या वतीने आमच्या कडे जसा साठा उपलब्ध होईल तसेच आम्ही रेशन दुकानदारास धान्य वितरित करू.
– भानुदास गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी ,पुणे

कोरोना रोगाने घातलेले थैमान यामुळे मागील सहा महिन्यांत हाताला काम नाही त्यातच सरकारकडून अल्प दरात अन्नधान्य मिळत होते आता ते पण गेले तीन महिने होऊनही मिळाले नाही.दुकानदार सांगतोय की आम्हाला धान्य मिळालेच नाही आम्ही तरी कुठून देणार.
– एक कार्ड धारक.

अनेक कार्डधारक हे गरीब असून शासनाने त्यांना अन्नसुरक्षेचे घेणे गरजेचे असतानाही त्यांची अल्प उत्पन्नाचे दाखले व नवीन फॉर्म भरून देऊनही नोंदणी केली गेली नाही या प्रत्येक नोंदणीसाठी पर कार्डप्रमाणे संबंधित विभागातील अधिकारी पाचशे रुपये नोंदणी फी एका कार्ड साठी मागितले जातात.हे एका त्रस्त दुकानदाराने त्याचे नाव न छापण्याच्या अटीवर माहिती दिली.
– एक त्रस्त रेशन, दुकानदार