दिल्लीमध्ये डॉक्टरची आत्महत्या ! 3 पानाची सुसाईड नोट मिळाली, AAP च्या आमदारावर धमकावल्याचा आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दक्षिण दिल्लीच्या देवळी भागात शनिवारी सकाळी ५२ वर्षीय डॉक्टर राजेंद्र सिंह यांच्या आत्महत्या प्रकरणाला नवीन वळण लागले. कुटुंबाने पोलिसांना ३ पानांची सुसाइड नोट दिली आहे, ज्यात आम आदमी पक्षाचे स्थानिक आमदार प्रकाश जारवाल आणि त्यांचे सहकारी कपिल नागर यांनी त्यांना धमकावले आणि मानसिक छळ केल्याचा आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घराच्या जवळ आपले क्लिनिक चालवणाऱ्या डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी सकाळी ५-६ वाजण्याच्या दरम्यान घराच्या छतावर आत्महत्या केली. राजेंद्र यांनी छतावर दोरीचा फास बनवून आपला जीव घेतला. माहिती मिळताच कुटुंबीयांनी पोलिसांना फोन करून कळवले.

वेळेवर पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह पोस्टमोर्टमसाठी दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानकडे पाठवला आणि पुढचा तपास सुरु केला आहे.


त्यांच्या घरी राहणाऱ्या भाडेकरूने सकाळी ५.३० वाजता राजेंद्र सिंह यांना फासावर लकटलेले पाहिले तर घरातील लोकांना सूचित केले, असे सांगितले जात आहे. तर कुटुंबीयांनी डॉक्टरांचे लिहिलेले ३ पानांचे सुसाइड नोटही पोलिसांकडे सोपवले आहे, ज्यात आप आमदारावर अनेक गंभीर आरोप लावले आहेत.

कुटुंबियांनी देवळीमधून आम आदमी पार्टीचे आमदार प्रकाश जारवाल आणि त्यांचे सहकारी कपिल नागर यांच्यावर धमकी देण्यासह छळ केल्याचा आरोप देखील लावला आहे. कुटुंबियांच्या लेखी तक्रारीवर पोलिसांनी आप आमदार प्रकाश जारवाल आणि कपिल नागर विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कुटुंबियांचे म्हणणे आहे की, राजेंद्र यांनी आत्महत्या करण्याअगोदर सुसाइड लिहिले होते. कुटुंबीयांनी सुसाइड नोटचा हवाला देत आप आमदार प्रकाश जारवाल आणि त्यांचे सहकारी कपिल नागर वर धमकी दिल्याचा आरोप लावला आहे, सोबतच म्हटले आहे की, दोघांनी धमकी दिल्यामुळे आणि छळल्यामुळे डॉक्टरांनी आत्महत्या सारखे मोठे पाऊल उचलले आहे.