मोबाईल सॅनिटायझरनं क्लिन करतांय ? थांबा, पहिले ‘हे’ वाचा अन्यथा…

पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात दिवसेंदिवस कोरोना संसर्गित रुग्णांची वाढ होत आहे. त्यामुळे आपले हात आणि आपण हाताळत असलेल्या वस्तू म्हणजे चाव्या, मोबाईल, पैसे इतर गोष्टी सॅनिटाइझ करुन घ्या असा सल्ला सातत्याने दिला जातो. कोरोना संसर्गाच्या या काळात स्वच्छतेला अधिक महत्व प्राप्त झालं आहे.

मोबाईल ही तर नेहमी हातात राहणारी वस्तू. त्याच्यावर विषाणू बसण्याची शक्यता सर्वाधिक असते. म्हणून फक्त हात धूत राहून चालणार नाही. तर मोबाईल सुद्धा दिवसांतून अनेकदा स्वच्छ ठेवणे गरजेचं आहे. त्यासाठी सॅनिटायझर हे सर्वात प्रभावी उपाय आहे. मात्र, ते योग्य प्रकारे वापरले नाही तर, तुमच्या फोनची स्क्रीन, कॅमेरा हेडफोन खराब होण्याची शक्यता निर्माण होते. म्हणून आज आम्ही तुम्हाला फोन कसा सॅनिटायझ करायचा, याबद्दल माहिती सांगणार आहोत.

कापूस आणि वायपरने

मार्केटमध्ये कापूस आणि अनेक प्रकारचे वायपर मिळतात. हे वायपर अनेकदा ब्युटी पार्लरमध्ये वापरले जातात. त्याचा उपयोग जास्तीचा मेकअप टिपून काढणे चेहरा स्वच्छ करणे यासाठी वापरले जात. हेच तुम्ही मोबाईल स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता. सॅनिटायझरचा डायरेक्ट स्प्रे मोबाईलवर न वापरता या वायपरच्या किंवा कापसाच्या साहाय्याने स्वच्छ करा. सर्वात प्रथम फोन स्विच ऑफ करा. नंतर कापसाचा बोळा वायपर अल्कोहोलमध्ये डीप करुन फोनची स्क्रीन सरळ धरुन स्वच्छ करा. यासाठी तुम्ही आपल्या मोबाईल कंपनीच्या कस्टमर केअरला फोन करुन त्यांचा सल्ला घ्या. कारण सर्वच कंपन्यांचे फोन मटेरिअल वेगवगेळे असू शकतात. अॅपल स्मार्टफोन कंपनीने आपले मोबाईल साफ कसे करायचे याबाबत सूचना जारी केल्या आहेत.

अँटी बॅक्टेरीअल टिशू पेपर

मेडिकल स्टोअरमध्ये तुम्हाला असे टिश्यू मिळतात. त्याने देखील तुम्ही आपले मोबाईल स्वच्छ करु शकता. तसेच कमी अल्कोहोल असलेले किंवा डायल्यूटेड वापरले, तर विषाणूला वापरण्यास दुर्बल ठरेल. शिवाय ते वापरुन सुद्धा फोन खराब होणार नाही, असे नाही. वायपर अथवा कापसाने स्वच्छ केला, तर फोन खराब होण्याची शक्यता थोडी कमी होते. पण १००% नाही.

अशावेळी काय करायचं?

प्रथम आपल्या फोनला स्क्रॅचगार्ड बसवून घ्या. विना स्क्रॅचगार्ड फोन ठेवू नका. स्क्रॅचगार्डमुळे केवळ फोनवर चरे पडण्यापासून संरक्षण मिळणार नाही, तर सॅनिटायझरने साफ केले तर थेट फोनला न लागता स्क्रॅचगार्ड वरील विषाणू नष्ट करुन फोनला अल्कोहोलपासून वाचवायचे काम करेल. अ‍ॅपल कंपनीने देखील ते सुचवलेले आहे. अर्थात कोणतेही द्रावण वायपर किंवा कापसाच्या बोळ्यावर घेऊनच त्याने हलकेच फोन स्वच्छ करायचा आहे. त्याला खूप चोळायचं नाही, किंवा त्यावर स्प्रे मारत राहायचं नाही. दुकानांत अल्कोहोल फ्री हॅन्ड सॅनिटायझर देखील मिळतात. त्यांचा वापर तुम्ही फोन स्वच्छ करण्यासाठी करू शकता. हे सॅनिटायझर देखील चांगले असतात. त्यांनी बॅक्टेरीया आणि विषाणू दोन्ही मरतात. असे सॅनिटायझर छोट्या बाटल्यांमध्ये खिशात ठेवता येतील असे आणि फोमस्वरुपातही मिळतात.

साबणाने स्वच्छ करा

सर्वात स्वस्त आणि जलद उपाय म्हणजे साबण. सध्याच्या काळात अनेकदा बाजारात सॅनिटायझरची कमतरता भासते. त्यासाठी सोपा उपाय म्हणजे ज्या साबणाने हात स्वच्छ करतो त्याच साबणाच्या कोमट पाण्याने आपला स्मार्टफोन स्वच्छ करु शकता. हे साबणाचे पाणी कापसावर घेऊन किंवा हातरुमालावर घेऊन त्याने आपला स्वच्छ करा. ते सुरक्षित आहे. कारण सध्याचे बहुतेक फोन हे वॉटरप्रूफ आहेत.

दिवसातून किती वेळा स्वच्छ करावा मोबाईल?

तुम्ही जर दररोज पडत असाल, जास्त लोकांशी संपर्क येत असेल, तर असे सुरक्षित सॅनिटायझर किंवा साबणाचे पाणी छोट्या बाटलीत ठेवून, जेव्हा जेव्हा तुम्हाला आवश्यक वाटेल तेव्हा वायपरचा एक जलद हात मोबाईलवरुन फिरवून घ्या. पण घरीच असाल, तर सतत मोबाईल स्वच्छ करण्याची गरज नाही. दिवसातून दोन वेळा केला तरी चालेल.