‘मिठू-मिठू’ नाही तर ‘पोलीस-पोलीस’ बोलून हा पोपट करायचा ड्रग डिलरला अलर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाळीव प्राणी म्हणून अनेकदा पोपट पाळले जातात. त्याला बोलायला देखील शिकवले जाते. पण एका गैर कृत्यात अलर्ट करण्याची जबाबदारी एका ड्रग डिलरने पोपटावर सोपवली होती. हा पोपट आपले काम देखील तितक्याच चोख पद्धतीनं पार पाडत होता. ब्राझील मधील एका ड्रग डीलर महिलेचा पोपट पोलीस आल्यानंतर अलर्ट करण्याचे काम करीत होता. या पोपटाला पोलिसांनी पकडले आहे.

ब्राझीलमध्ये पोलिसांनी नुकतेच एका ड्रग डिलरकडे धाड टाकली होती. पण पोलीस तिथे पोहचताच बाहेर पिंजऱ्यात असलेला पोपट जोरजोरात ‘मम्मा पोलीस, मम्मा पोलीस…’ असं ओरडू लागला. अर्थातच ड्रग डीलरने या पोपटाला खासप्रकारचं ट्रेनिंग दिलं होतं. जेणेकरुन असा काही धोका असेल तर वेळीच त्यांना कळावं. याठिकाणी एक महिला ड्रगचा धंदा चालवते या महिलेला यापूर्वी देखील दोन वेळा पोलिसांनी ड्रग केसमध्ये अटक केली होती. आता यावेळेला तिच्या पतीला अटक केली आहे. त्याच्याकडून ४ पॅकेट कोकेन जप्त केले आहे. या ड्रग डीलर महिलेचा पोपट सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला एका प्राणी संग्रहालयात ठेवण्यात आले आहे.